माळशिरस येथे हिरकणी कक्षाच्या माध्यमातून वारकरी महिलांसाठी विशेष सुविधा

माळशिरस येथे हिरकणी कक्षाच्या माध्यमातून वारकरी महिलांसाठी विशेष सुविधा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
माळशिरस – प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी आल्यानंतर वारकरी महिलांसाठी तीन ठिकाणी हिरकणी कक्ष उभारले गेले. या कक्षामध्ये महिलांना विश्रांतीसाठी, स्तनदा मातांसाठी व इतर आवश्यक गरजांसाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली. वारकरी महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. या कक्षामध्ये महिलांनी विश्रांती घेतली,स्तनपान करण्यासाठी चांगली सोय झाली व इतर आवश्यक सेवा ही पुरवण्यात आल्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प पश्चिम सोलापूर नागरी बीट माळशिरस अंतर्गत प्रकल्प अधिकारी जाधव व पर्यवेक्षिका सणगर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस मध्ये तिन ठिकाणी असलेल्या हिरकणी कक्षात वारकरी महिलांना सर्व सोयी पुरवण्यासाठी माळशिरस मधील सेविका, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.