“पीछडावर्ग ओबीसींना आरक्षण तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिलीच पाहिजे.! विठ्ठल राजे पवार यांची मागणी.,,

“पीछडावर्ग ओबीसींना आरक्षण तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिलीच पाहिजे.! विठ्ठल राजे पवार यांची मागणी.,,
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था जयपूर राजस्थान :
“शरद जोशी विचारमंच किसान कामगार महासंघ फाउंडेशन, किसान संघ़टन, एनयूबीसी संघटनांच्या वतीने चौधरी ब्रह्मप्रकाश यांची 107 वी जयंती देशभर उत्सहात साजरी करण्यात आली, भारतामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी, कष्टकरी, ओबीसी या आर्थिक पिछडा वर्गांना केंद्र सरकारने आरक्षण आणि त्यांच्या हक्काचं कर्जमुक्तीसह त्यांना दिलेच पाहिजे अशी मागणी विठ्ठल राजे पवार यांनी जयपूर (राजस्थान) येथे जाहीर सभेत केली, एनयूबीसी राष्ट्रीय कार्यकारणी आणि चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्या जयंतीनिमित्त 16 जून रोजी जयपूर येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन राजस्थान प्रदेशाचे अध्यक्ष राजपाल मीना यांच्या वतीने करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल राजे पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष एस गीता होत्या.
सदर बाबत मागण्यांचे निवेदन राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ जी बागडे यांना देण्यात आले.
एन यू बी सी अर्थात राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच दिल्लीचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे तत्कालीन कृषी मंत्री चौधरी ब्रह्मप्रकाशजी यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त 16 जून रोजी जयपूर येथे राजस्थान प्रदेश शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जयपूर येथील कार्यक्रमाला देशभरातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, गुजरात, तेलंगणा, चेन्नई, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू कश्मीर, उत्तराखंड, ओडीसा, उत्तरांचल, मध्य प्रदेश, गोवा कलकत्ता, केरला, आधी 24/25 राज्यातील विविध संस्था व शाखांचे पदाधिकारी व प्रदेशाध्यक्ष तसेच संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष एस गीता तसेच संघटनेचे वेस्टर्न भारताचे अध्यक्ष तसेच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, एनयूबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत ल. नायकुडे, दिल्ली उत्तर भारताचे अध्यक्ष आशिष कारखानिस, राष्ट्रीय कोषाध्यक्ष हरनाम सिंह यादव, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष राजपाल मीना, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख सुखलाल टाटू मीना, आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
“यावेळी बोलताना विठ्ठल राजे पवार म्हणाले की भारत देशामध्ये 145 कोटीची आबादी आहे. यामध्ये जवळपास 60 ते 70 कोटी हे पिछडावर्ग अर्थात शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांची संख्या असून देशातल्या 80 कोटी जनतेला हे लोक मोफत अन्नपूर्णा जगवत आहेत म्हणून देशाच्या पंतप्रधानांची छाती 56 इंचाची झालेली आहे. याची जाण इंडिया सरकारने ठेवून शेतकऱी हा पिछड्या वर्गात गेल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झालेली त्या सर्व पिचडा वर्ग किसान ओबीसींना आरक्षण देणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिल्याप्रमाणे पिछडा वर्ग शेतकऱ्यांना आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. ते दिलं गेलं नाही तर देशामध्ये जो पिछडावर्ग ओबीसी घटक अन्नधान्य पिकवतो, पुरवतो आहे त्याची संख्या कमी होऊन इंडींयाची अन्नसुरक्षा पुढे धोक्यात येऊ शकते असा गंभीर इशारा देत देशभरातील शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला असल्याने तो पिछडावर्ग ओबीसी घटकातला आहे म्हणून त्याला सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती देणे आवश्यक आहे.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेने न्यायिक लढाई लढत महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची 51 हजार कोटी रुपयांची वीज बिल मुक्ती संघटनेने मिळवून दिलेले आहे, त्यासाठी संघटनेने अथक परिश्रम घेत मुंबई उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाकडे याचिका दाखल करत शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातल्या कृषीपंप धारक शेतकऱ्यांची वीज बिल मुक्त झाली आहे. या पुढची कृषी पंपासाठी ची वीज शेतकऱ्यांना मोफत आणि सलग देण्याच्या संदर्भात माननीय न्यायालय व आयोगाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे कृषीसाठीची सलग विज शेतकऱ्यांना मिळणार अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारने केल्यामुळे राज्य सरकारचे संघटनेच्या वतीने विठ्ठल राजे पवार आंदोलक व याचिकाकर्ते यांनी खास अभिनंदन केले आहे.
*”परंतू भारत आणि इंडिया यामधील दरी कमी करायची असेल तर शेतकरी कष्टकरी पिछडा वर्ग ओबीसी घटक हा केंद्रबिंदू मानून शेतीला उद्योजकांचा दर्जा देत इंडिया सरकारने लवकरात लवकर, कृषी किंमत न्यायाधीकरणाची स्थापना करून देशभरातील, शेतकऱ्यांनाशी सर्व प्रकारच्या पिकवलेल्या शेतमालाला धनियापासून ते मिरची पर्यंत सर्व प्रकारच्या शेतमालाला बेस रेट अर्थात एमएसपी किंमत केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर करायला लागेल अन्यथा पाकिस्तान सारखी अन्य देशाची झालेली परिस्थिती भारताची होऊ शकते हे इंडिया सरकारने लक्षात घ्यावं असा आवाहन करत त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.,,
राजे पवार पुढे म्हणाले की चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी किसान, ओबीसी, कामगार यांना केंद्रस्थानी ठेवू, पिछडावर्ग आणि घटकांना लक्षात घेऊन चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी 11 नोव्हेंबर 1982 रोजी एनयूबीसी या संघ़टनेची स्थापना केली, तत्पूर्वी ते देशाचे कृषिमंत्री त्यांचे कार्य लक्षात ठेवण्या जोगे आहे, तर दिल्लीचे तत्कालीन पहीले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी देशात भरीव कार्य केलेले आहे, ज्यांनी एनयूबीसी या संघटनेची स्थापना केली, अनेक महान नेत्यांनी या संघटनेचे राष्ट्रीय नेतृत्व केला आहे आणि आज आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद एका महिलेकडे ज्यांनी चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्यासोबत काम केलेला आहे अशा एस गीता या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो संपूर्ण देशात एन्.यु.बी.सी. ही गीता मॅडम यांच्यासोबत कणखरपणे उभी राहिलेली आहे. त्यांना सर्व प्रकारचं समर्थन देशभरातील एनयूबीसी च्या पदाधिकाऱ्यांकडून मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या त्या सर्व संघटनांचे चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्या सर्वांना नमन करतो, आणि केंद्र सरकारने यापुढे एनयूबीसी घटकांकडे आणि संघटनेच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी विठ्ठल राजे पवार यांनी केली आहे.
“एनयूबीसीचे संस्थापक चौधरी ब्रह्मप्रकाश जी यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या देशभरातील सर्व प्रमुखांचा राजस्थान शाखेच्या वतीने राजस्थान प्रदेशाध्यक्ष राजपाल मीना व टिम यांनी राष्ट्रीय अध्यक्ष एस गीता, महाराष्ट्र राज्य तसेच वेस्टन भारताचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत ल. नायकुडे, संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हरिनाम सिंग यादव यांसह सर्वांचं शाल पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन सन्मान केला त्याबद्दल विठ्ठल राजे पवार यांनी त्याचे त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच देशभरात एनयूबीसी ची चळवळ मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होण्याचं आव्हान देखील त्यांनी केला आहे.