!! जागो धनगर जागो, जागते रहो सावधान!!

!! जागो धनगर जागो, जागते रहो सावधान!!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : भाग्यवंत ल.नायकुडे,अकलूज
दुर्गापूरा, जयपूर येथून,पहाटे 4:05 वाजता.
दिनांक 15/06/2025 :
महाराष्ट्रातील २ करोड धनगर बंधू भगिनींनो मातांनो, सज्जनांनो.
विधानसभेची निवडणूक संपून नवीन सरकार आलेले ७ महिने झाले पण धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीची साधी पुसटसी सुद्धा रेघ ओढायला फडणवीस सरकार तयार नाही.
निवडणुकीच्या तोंडावर धनगर विरांनी मंत्रालय डोक्यावर घेऊन दनानून सोडल्यावर माननीय शिंदेसरकारने १५ दिवसांच्या आत धनगर आरक्षण अंमलबजावणीचा GR काढतो म्हणून लेखी दिले.
मा श्री प्रकाश आण्णा शेंडगेसाहेब मा आ श्री गोपीचंदजी पडळकर साहेब, मा श्री मधुजी शिंदे साहेब, मी स्वतः पांडुरंग मेरगळ, मा श्री विजयराव गोफने साहेब या पाच जणांची कमिटी नेमली, आम्ही रात्रंदिवस पहाटे 2/3 वाजेपर्यंत काम करायचो दिवसभर मंत्रालयात या ठिकाणाहून त्या मजल्यावर फिरून फिरून थकून जाऊन भोंडाळून पडायचो.
आमच्या बरोबर नेमलेले IAS अधिकारी खात्रीने सांगायचे कि तुमचे आरक्षण आत्ता मिळाल्यात जमा आहे.
पण दुर्दैवाने ७७ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही धनगरांच्या पालावर वाडग्यावर वाघरिवार, धनगर वाड्यावर काळाकुट्ट अंधारच आहे.
प्रत्येक हरामखोर शासक आम्हांला गंडवण्यातच माहीर निघतोय.
मित्रांनो याला केवळ आपल्यामध्ये नसलेली शिस्त, केडर, विश्वास, अज्ञान, राजकारणासाठीचा हावरटपणा आणि गद्दार नेत्यांची पैदास.
प्रत्येक आंदोलनात फक्त एक नेता जन्म घेतो पण धनगरांच्या हातात काहीच पडत नाही.
माझ्या प्रिय बांधवांनो पुन्हा एकदा सैनिकांची जुळवाजूळव करण्याची वेळ आलेली आहे.
सरकारला हे विचारायचे आहे कि गाजावाजा करून बनवलेल्या ९ सदस्य असलेल्या शिंदे समितीचा अहवाल सरकारने कुणाच्या आईच्या कानात घालून ठेवला आहे.
धनगरांसाठी सुट्या कॅन्सल करून घेतलेल्या बैठकीत १५ दिवसात GR काढणार होतात, मग आत्ता नऊ महिने ९ दिवस झाले तरी सरकारच्या पोटात गर्भधारणा झालेले धनगरी आरक्षण रुपी बाळ जन्म का घेत नाही.
का पोटात मुसळ आहे आणि ते जर बाहेर निघाले तर सरकारचा सर्वनाश तर करणार नाही ना?
ही तर भिती सरकारला नाही ना?
अरे माझ्या भाबड्या भावांनो ज्यासरकारमध्ये मा अजितदादा पवार आहेत ते सरकार धनगरांना आरक्षण देईल असे स्वप्नांतही आणू नये.
पण मग फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, कोर्टातून देतो, महाधिवकत्यांना विचारून देतो, शिंदेनी १५ दिवसात देतो. ही चेष्टा धनगरांची का म्हणून केली.
या वेळेसचे आंदोलना ऐन भारत असताना रातोरात महसूल मंत्रालयात आदीवासी सचिवांच्या शिफारसीवरून स्टॅम्प ड्युटी ऍक्ट मधील ” धनगर “चे “धनगड ” का केले गेले.
धनगर आंदोलक आक्रमक झाल्यावर परत रातोरात “धनगड ” चे ” धनगर ” का केले गेले.
यातील झारितील आ××ला शुक्राचार्य कोण? हे उभ्या महाराष्ट्राला कळालेच पाहिजे.
माझ्या २०० लाख भावांनो १ लाख इंग्रजानी एवढा मोठा भारत देश १५० वर्षे गुलाम ठेवला होता. तुम्हीं त्यांच्या २०० पट आहात. दया फेकून गुलामीची जळमटे आजनी व्हा तयार लढायला.
गर्जून टाकू आसमंत सारा. गगनभेंदी आरोळ्यांनी महाराष्ट्राचा आकाश भरून जाऊद्या.
फुर्फुरणाऱ्या तुमच्या दंड पिंढऱ्यांमध्ये दहा दहा हट्टीचे बळाचा संचार होऊ द्या.
आपल्या विकासाचा रथ आत्ता आपल्यालाच वेगवान करावा लागेल.
अंधाऱ्या कोठडित, राणावनात, दुर्गम डोंगरात आत्ता तुम्हांला तुमच्या उज्ज्वल भविष्याचा राजमार्ग गवसणार ( सापडणार ) नाही.
आत्ता तुमचा राज्याभिषेक तुम्हां स्वतःलाच करून घ्यावा लागेल.
तुमची सनद आत्ता फक्त तुम्हीच लिहू शकता.
बाकीचे कोणीतरी लिहील लिहील म्हणून चार पिढ्या मरून गेल्या.
बाबांनो छोट्या छोट्या जाती जमाती ऐश्वऱर्याच्या शिखरावर असताना आम्ही मात्र नदी नाले, हमालीच्या जागा, वेठबिगारीची कोठारेच शोधत बसलोय.
माझ्या जमात बांधवांनो होळकरी दंगा केल्याशिवाय हातात काही पडणार नाही. लढणाऱ्यांची अवलाद आपली पण पोटजातीच्या विषमज्वराणे पुरते घायाळ झालेले आपण आणि दलाल भडव्यांनाच आपले उधारकर्ते समजल्यामुळे आपला पुरता नायनाट व्हायची वेळ आली आहे.
धनगर आज एवढ्या पिछाडीवर फेकला गेला आहे कि संघटित होऊन शिस्त समजून घेऊन प्रचंड आक्रमक लढा उभा करण्याशिवाय तरनोपाय नाही.
बिलकुल नकारात्मक विचार न करता फक्त एकत्र या आपण नक्की आपल्या जमातीचे कल्याण करून घेऊ.
धनगर आरक्षण त्यातून मिळणारे शिक्षण, नोकऱ्या, आजनी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या हजारो लाखो संधी तुमची वाट पहात आहेत पण कपाळकरनंट्यानो घरातून बाहेर कोण निघणार?
आजपर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात आपण सर्वांनी एकत्र येऊन काहींना काहीतरी विषय पुढे रेटलेला आहेच.
अजूनही मोठया ताकतीची आवश्यकता आहे.
मित्रांनो या विषयावर सांगोपंग चर्चा करून एका मोठ्या राज्यव्यापी आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी एवढ्या काही दिवसात एक दिवशीय मुक्कामी चिंतन बैठक लावायची आहे.
सदर बैठक सकल धनगर समाज म्हणून आपणास पार पाडायची आहे. कुठलीही संघटना, अथवा पार्टी, पक्ष याचा काहीही समंध नाही, नसणार भी.
निखळ समाजाचे हित, ST आरक्षणसाठी करायचे प्रचंड मोठे आंदोलन हाच मुख्य विषय.
साधारणतः संपूर्ण राज्यातून ३०० प्रतिनिधी यावेत, त्यांची राहण्याची व तीन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. म्हणून शक्यतो जर प्रत्येकानेच आपला आपला प्रत्येकी १००० खर्च स्वतःहून अगोदरच ऑनलाईन पाठवला. व तसा मेसेज आपला नाव गांव पत्ता, पद सांगून आगाऊ कल्पना दिली तर एवढ्या १५ ते २० दिवसात अश्या प्रकारची चिंतन बैठक राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी घेता येईल.
कृपया सर्वांनी हा संदेश गंभीरता पूर्वक घ्यावा, वाचावा, राज्यातील प्रत्येक धनगर वाड्यापाड्या वर हा मेसेज गेला पाहिजे म्हणून व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा, या सर्वं सोशियला मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वदूर प्रसिद्ध करा.
ज्यांना ज्यांना या आंदोलनात प्रमुख भूमिका बजावयाची आहे त्या सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच या आंदोलनाचा कोणीही नेता नाही.
आपण २०१९, व २०२४ दोन्ही वेळेस पाहिले आहे आपला सर्वं कारभार पूर्णपणे पारदर्शक असतो.
चला तर मग हा विषय प्रत्येक धनगर युवकाच्या व व्यक्तीचा वैयक्तिक कार्यक्रम आहे अश्या वेगाने कामाला लागूयात.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाची चकोर पक्षांप्रमाणे वाट पहातोय.
जय मल्हार, जय अहिल्यामाता.
पांडुरंग मेरगळ.
9822022996.
8329532711.