छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा शंकरनगर येथे साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा शंकरनगर येथे साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 07/06/2025 :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त शिवपार्वती मंदिर शंकरनगर येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सोहळा साजरा झाला.
महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती शंकरनगर अकलूज यांच्यावतीने हा सोहळा आयोजित केला होता.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षि साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सौ ऋतुजादेवी मोहिते पाटील, कृष्णप्रिया मोहिते पाटील राजइंदिरा मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे यांचे सह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती या महानाट्याची चित्रफित प्रसारित करण्यात आली. मशालधारक मावळे, तुतारीचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी व छत्रपतींचा जयघोषाने आसमंत दुमदुमला. व संपूर्ण परिसर शिवमय झाला. यात्रा समितीच्या वतीने व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख यांचे हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.