IPL क्रिकेट आणखी एक अफूची गोळी !
IPL क्रिकेट आणखी एक अफूची गोळी !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : अनिल पाटील, पेठवडगाव / आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 06/06/2025 :
भारतात लोकांना गेल्या दहा वीस वर्षात अफूच्या दोन गोळ्या दिल्या गेल्या आहेत. पहिली धर्माच्या नावाची ची, दुसरी IPL क्रिकेट ची.
आता वारंवार गोळी खाल्यावर एकतर अकाली मृत्यू होणार जसा काल बेंगलोर मध्ये दहा मुलांचा झाला किंवा माणसे हिंसक होणार, जसे इचलकरंजी मध्ये झाले. देश इतक्या मूर्ख लोकांनी भरला आहे, इतक्या वैज्ञानिक व शैक्षणिक प्रगती नंतर सुद्धा इतके आंधळे होतात हेच आश्चर्य आहे.
मुळात RCB ना बेंगलोर ची टीम ना कर्नाटक ची. अख्या टीम मध्ये कर्नाटक चे खेळाडू खच्चून एक (देवदत्त नाव आहे असे कळते). ना ती टीम किंवा संघ कर्नाटक सरकार पुरस्कृत ना ती कर्नाटक क्रिकेट असोसिएशन ने निवडलेली टीम. बेंगलोर दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई अशा नावलौकिक असलेल्या महानगराची नावे वापरून केलेले भावनिक ब्लॅकमेलिंग.
बरं IPL क्रिकेट म्हटले तर बाद बॉलर मंडळीचा कुंभमेळा. फलंदाजाने भारी शॉट मारला ह्या पेक्षा बॉलर ने टाकलेला बॉल चांगला होता की बाद असे जेव्हा पाहिले जाईल तेव्हा बहुतेक बॉलर दुनियेच्या शिव्या खाताना दिसतील आणि IPL चे फॅड कमी होईल किंवा स्पर्धा स्वरूपावर संशय निर्माण होईल.
आम्ही सुद्धा विद्यापीठ, जिल्हा, गल्ली क्रिकेट खेळलो फुकट. लंच भत्ता सोडला तर कोणताही पैसा दिला जात नव्हता. असं असताना मॅच वेळी ऐका ओव्हर मध्ये दोन तीन बाद बॉल हिशोबाने सलग दोन तीन ओव्हर बॉलिंग बाद केल्यास कोचं कॅप्टन सिनियर च्या शिव्या तर खायला लागायच्या शिवाय पुढच्या किमान दोन तीन मॅच बाहेर बसायला लागून करियर वर प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती निर्माण व्हायची. IPL खेळणारे बॉलर नशीबवान. किती पण बाद बॉलिंग करु दे पुढच्या मॅच मध्ये खेळायला मिळणारच. आधीच विकत घेतल्याने पैसा तर मिळलेलाच आहे.
अशा ह्या दिखाऊ क्रिकेट ची नशा देशात अनेकांनी पैसे देऊन विकत घेतली. तिकडे संघ मालक हजारो कोटी मिळवत असताना इकडे कामधंदा नोकरी मध्ये लक्ष्य घालायचे सोडून गाढव प्रेक्षक घरातील टीव्ही साठी लाईट खर्च करुन किंवा मोबाईल चार्जिंग खर्च करुन मॅच बघतात. ज्यांनी आयुष्यात कधी मैदानावर पाय सुद्धा ठेवलेला नाही असे असंख्य रोज पाच सहा तास IPL मध्ये घालवतात.
IPL चा फॉरमॅट इतका भंपक आहे की ह्यात मिळणारा पैसा कोणत्याही राज्य क्रिकेट संघटना किंवा जिल्हा क्रिकेट संघटना कडे जात नाही. कोणताही खेळाडू विकास कार्यक्रम IPL आयोजक तर्फे देशभर राबवला जात नाही.
बंगलोर मध्ये हत्याकांड बाबत IPL, RCB आणि कर्नाटक सरकार यांना आरोपी केले पाहिजे.
मुळात विजेत्या टीमचा कर्नाटक शी दुरान्वये संबंध नसताना त्यांनी सत्कार आयोजन का केले हेच न कळणारे. दुसऱ्याच्या प्रसिद्धीवर स्वतः स्वार होण्याचा त्यांचा प्रयत्न दहा अकरा घरे उजाडण्यात कारणीभूत झाला. खेळ होता. काल झाला. आता कामाचं बघा असं सांगायचं सोडून मुख्यमंत्री सह त्यांचे अति उत्साही सरकार आगाऊपणा करताना दिसले. सर्वांवर सदोष मनुष्यवधाची केस घातली पाहिजे. मृताना मदत केवळ सरकार ने का दिली. BCCI, IPL किंवा RCB ने पर हेड किमान एक कोटी मदत दिली पाहिजे.
लुटारू लोकांच्या ह्या क्रिकेट जगात IPL अफू ची गोळी खालेल्या सर्वांच्या प्रगतीची चिंता आहे. खेळ हा खेळच अस्तो. बघून सोडून द्यायचा अस्तो. डोक्यात घ्यायचा नसतो. मृत पावलेल्या मुलांच्या घरात काय प्रसंग आला असेल प्रत्येकाने विचार करावा.
✍️ सुधर्म वाझे.