“धैर्यशिल मोहिते पाटील एक लढवय्या नेता”

“धैर्यशिल मोहिते पाटील एक लढवय्या नेता”
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 13/04/2024 :
जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व, दिलेला शब्द प्रमाण मानून तो पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, राजकीय पटलावर अनेक चढउतार अनुभवून परिपक्व झालेले लढवय्ये, सर्वसामान्यांसाठी कधीही उपलब्ध असणारे व हजारो कार्यकर्त्यांसाठी जीव की, प्राण असणारा नेता म्हणून भावी खासदार धैर्यशिल( भैय्यासाहेब) मोहिते पाटील यांची ओळख आहे.
प्रचंड लोकसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व म्हणून मा.धैर्यशिल मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व दूरदृष्टी हे त्यांचे वेगळे गुण आहेत. राजकारणात संघर्षाशिवाय काही मिळत नाही असं म्हटलं जातं.
म्हणून त्यांनी यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे, त्यांचा या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला आपला माणूस आपला खासदार होणार ही लोकभावना तयार झाली आहे.
आज त्यांचा वाढदिवस खरं अर्थांने यंदा त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असेल तर सर्व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करून खासदार म्हणून निवडून आणणं हेच खरं गिफ्ट आहे.त्यासाठी आपणं सर्वजण एकदिलाने काम करू आणि आपल्या हक्काचा खासदार दिल्लीला रवाना करू या.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांचा विकासाचा वारसा आणि महाराष्ट्र राज्यांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते,यांच्या मार्गदर्शनाखाली व विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, माढ्याचे भावी आमदार शिवतेंजसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत.
भावी खासदार धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी विजय प्रताप युवामंच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले त्यामध्ये श्रमदानातून बंधारे बांधले, शालेय विद्यार्थी यांच्या अनेक समस्या सोडवल्या, शेतकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून काम करतात, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलेसे करून काम करणारे नेतृत्व म्हणजे धैर्यशिल मोहिते पाटील.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अकलूज चे ते गेली अनेक वर्षे ते अध्यक्ष आहेत.राजर्षी शाहू महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , राजे नरवीर उमाजी नाईक, यांच्या विचारांचे स्मरण करून ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतात.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांचें भावी आयुष्या,सुख समृद्धीचें जावो,व लवकरच ते खासदार बनणार याच सदिच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
प्रा. नरेंद्र भोसले
बोरगांव
मो.9158681826