सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ निमंत्रक सदस्य बाबासाहेब क्षीरसागर यांची सदिच्छा भेट

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ निमंत्रक सदस्य बाबासाहेब क्षीरसागर यांची सदिच्छा भेट
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/10/2025 :
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ निमंत्रक सदस्य बाबासाहेब बळीराम क्षीरसागर ( माजी कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी सभापती, पंचायत समिती मोहोळ) यांनी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या संपर्क कार्यालय अकलूज येथे रात्री सदिच्छा भेट देऊन गिरीश शेटे यांचे अभिनंदन केले. माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर यांना मानाची गांधी टोपी, उपरणे आणि बुफे देऊन सन्मानित केले. याप्रसंगी सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, युवा नेते यशराज गिरीश शेटे, अविनाश उत्तम जगताप, निलेश जालिंदर पगारे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ नेते बाबासाहेब शिरसागर यांनी काँग्रेस मधील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनुभवांची शिदोरी युवा कार्यकर्त्यांसाठी मोकळी केली. “आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या सदिच्छा भेटीमुळे आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना निश्चितच ऊर्जा प्राप्त झाली आहे”. असे याप्रसंगी तालुका अध्यक्ष गिरीश शेटे यांनी म्हटले.

