ताज्या घडामोडी

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केले फलटण-पंढरपूर, जेऊर-चौंडी-आष्टी रेल्वे प्रकल्पासाठी निवेदन

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केले फलटण-पंढरपूर, जेऊर-चौंडी-आष्टी रेल्वे प्रकल्पासाठी निवेदन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 30/5/2025 :
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुबंई मंत्रालयात भेट घेऊन फलटण-पंढरपूर आणि जेऊर-चौंडी-आष्टी रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य शासनाने ५० टक्के हिस्सा भरण्यास मंजूरी देण्याबाबत निवेदन सादर केले.
सदरचे प्रकल्प हे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त कंपनीने करणेचे ठरले होते. त्याप्रमाणे सदरच्या दोन्ही प्रकल्पासाठी राज्य शासनाचा ५० टक्के हिस्सा केंद्र सरकारला देणेबाबत तात्काळ मंजूरी देण्यात यावी ही विनंती केली जेणेकरुन सदरचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील व याचा लाभ नागरिकांना होईल असे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत विनंती केली आहे.
फलटण-पंढरपूर हा रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन अधिग्रहण सन १९२० साली झाले आहे. सदर प्रकल्पाचा विजयदादा खासदार असताना त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नातुन सन २०१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ११४९ कोटी रुपयास मान्यता देण्यात आली असून सदरच्या प्रकल्पासाठी सन २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्पामध्ये १० कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करणेत आली आहे.
जेऊर-चोंडी-आष्टी हा रेल्वे मार्ग प्रकल्पास सन २०१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये १५६० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली या प्रकल्पासाठी देखील २०१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये १० कोटी रुपयांची तरतूद करणेत आलेली आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी फलटण लोणंद रेल्वे मार्गाचे पूर्णत्वाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरवा केला याचेच फलित म्हणून भूसंपादनच्या सर्वेक्षणास देखील २.१० कोटी रू देखील मंजूर झाले आहे. आता फक्त राज्य शासनाचे ५० टक्के हिस्सा भरून प्रकल्पाचे काम सुरू करून पूर्णत्वास घेऊन जाणे गरजेचे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे स्थानिक जनतेत या रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वाबाबत आशा निर्माण झाली आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button