कै.आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त किर्तन संपन्न

कै.आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त किर्तन संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 07/07/2024 :
कर्णवर पाटील वस्ती गोरडवाडी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील जुन्या पिढीतील सदन शेतकरी कै. आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. गायनाचार्य उमेश महाराज किर्दत (सातारा) यांचे सकाळी 10 ते 12:5 या कालावधीत फुलाचे कीर्तन संपन्न झाले.
रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी कर्णवर पाटील वस्ती गोरडवाडी येथे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त फुलं वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. याप्रसंगी आप्तेष्ट, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, सगे सोयरे, हितचिंतक, भाविक आणि मान्यवरांनी उपस्थित राहून कै. आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून किर्तन सेवेचा आणि प्रसादाचा लाभ घेतला. श्री श्री सद्गुरू समर्थ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब आबाजी कर्णवर पाटील आणि कर्णवर पाटील परिवाराच्या वतीने प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेल्या उपस्थित उपस्थितांचे येतोचित स्वागत करून सर्व व्यवस्था उत्तमपणे केली.
” माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यक्रम कोणताही असो तो भव्य दिव्यतेने साजरा करण्याची परंपरा बाळासाहेब कर्णवर पाटील आणि कर्णवर पाटील परिवारानेच करून दाखवावी असे समीकरण बनलेले आहे” अशी चर्चा पुन्हा एकदा या निमित्ताने सर्वत्र सुरू आहे.