श्री कोळेकर स्वामी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त टेंभुर्णी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री कोळेकर स्वामी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त टेंभुर्णी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई, (केदारनाथ, उत्तराखंड येथून)
दिनांक20/5/2025 :
श्री गुरुमूर्ती निर्वाण रुद्रपशुपती 29 वे पिठाधिपती श्री कोळेकर स्वामी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त 31वे गुरुवर्य मठाधिपती यांच्या उपस्थितीत अखंड त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 24/5/2025 ते सोमवार दिनांक 26/5/2025 या कालावधीत टेंभुर्णी येथील श्री कोळेकर महाराज मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती पौरोहित्य उदय मधुकर स्वामी, टेंभुर्णी यांनी सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना सांगितली.
[श्री निर्वाण रुद्र पशुपती 30 वे कोळेकर महाराज]
या सोहळ्याचे व्यासपीठ चालक शिवभक्त परायण काशिनाथ स्वामी, शि.भ. प. संतोष शंकरराव तांबे, शि.भ. प. रामभाऊ तोडकरी, शि.भ. प. दत्तात्रय जठार वेणेगाव, शि.भ. प. गोविंद तळे हे आहेत.
टेंभुर्णी येथील मठामध्ये शनिवारी सकाळी 7 वाजता ध्वज पूजा, मंडप पूजा, टाळ विणा पूजा, ग्रंथ पूजा, सकाळी 7:25 वाजता संजीवन समाधीवर रुद्राभिषेक, पूजा, आरती, प्रसाद, सकाळी 8 ते 11 परमरहस्य ग्रंथ पारायण सुरू सायंकाळी 5 वाजता भजन, भारुड, शिवपाठ व प्रवचन.
रविवारी सकाळी 7:25 वाजता संजीवन समाधीवर रुद्राभिषेक, पूजा, आरती, प्रसाद. सकाळी 8 ते 11 परमरहस्य ग्रंथ पारायण, सायंकाळी 5 वाजता भजन, भारुड, शिवपाठ व प्रवचन.
सोमवारी सांगता समारंभ रोजी सकाळी7:25 वाजता संजीवन समाधीवर रुद्राभिषेक, पूजा, आरती, प्रसाद. सकाळी 8 वाजता परमरहस्य ग्रंथाची समाप्ती व आरती. सकाळी 9 ते 10
आशीर्वाद
श्री निर्वाण रुद्र पशुपती 31 वे कोळेकर महाराज यांची इष्टलिंग पूजा, पाद्य पूजा, तीर्थप्रसाद. सकाळी 10 ते 12 श्री 29 वे महाराजांचे पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शि. भ. प. छगन महाराज कदम यांचे प्रसादाचे शिव किर्तन व ठीक 12 वाजून 15 मिनिटांनी श्री 29 वे मठाधिपती यांच्या प्रतिमेवर रुद्र घोषात जय जय कार करीत पुष्प बेल, विभुती, गुलालाची वृष्टी करून पुण्यस्मरण सोहळा संपन्न होईल. नंतर महामंगल आरती, दुपारी 1 वाजता धर्मसभा, श्री गुरूंचा सत्कार, मान्यवरांचे मनोगत, श्री गुरु महाराजांचा आशीर्वचन व नंतर महामंगल आरती व नंतर महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे तरी सर्व भाविक शिवभक्तांनी तन-मन-धनाने सहभागी होऊन गुरुकृपेचा, गुरुप्रसादाचा, पुण्यपूर्व काळाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पौरोहित्य उदय मधुकर स्वामी टेंभुर्णी यांनी केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी हार्मोनियम हरिभाऊ मांजरे, राजेभाऊ जठार, चोपदार देविदास मांजरे सांगवी नंबर 2. मृदुंगाचार्य रामलिंग काका कोरे, काशिनाथ सुतार, बळीराम जठार, गायनाचार्य दत्तात्रय कोल्हे, उत्तम तळे, हनुमंत जठार, गायक सिद्धलिंग तळेकर (चुंबळी). रुद्र पशुपती महिला भजनी शिवपाठ मंडळ शिवपाठ व भजनी मंडळ : टेंभुर्णी, सांगवी नं.2, वेणेगाव वेळ: सायंकाळी 6 वाजता. या सर्व कार्यक्रमाचे संयोजक समस्त वीरशैव लिंगायत समाज व श्री रेणुकाचार्य महिला रुद्र मंडळ टेंभुर्णी हे आहेत.