विठ्ठल मरीबा धाइंजे यांचे निधन

विठ्ठल मरीबा धाइंजे यांचे निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
श्रीपूर/ प्रतिनिधी दिनांक 19/5/ 2025 : अकलूज येथील विठ्ठल मरिबा धाइंजे (वय 78 वर्षे )यांचे आज सकाळी अल्प आजाराने अकलूज येथे निधन झाले. विठ्ठल धाइंजे हे अतिशय शांत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून मध्ये ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी दोन वाजता अकलूज येथे अकलाई स्मशानभूमीत त्यांचे मृतदेहावर वर अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण तात्या धाइंजे यांचे ते वडील होत. विठ्ठल धाइंजे यांचे निधन झाल्याने धाइंजे यांचे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
किरण धाइंजे यांना आरपीआयचे राज्यातील अनेक वरिष्ठ नेते कार्यकर्ते तसेच सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संदेश पाठवून त्यांचे सांत्वन केले आहे.