‼️महावृक्ष ‼️

‼️महावृक्ष ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 15/05/2025 :
एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. आणि तेही पन्नास फुटाच्याही खाली. वडाची व पिंपळाची मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.
एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो. पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही. झाडाचे महत्व जाणाल तर तुमचं महत्व वाढेल.
✒️ प्रविण सरवदे, कराड
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳