ताज्या घडामोडी

तरस सदृश्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ बकरी ठार.. बागणी येथील घटना

तरस सदृश्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ बकरी ठार..
बागणी येथील घटना

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 10/01/2024 :
तरसदृश्य वन्यप्राण्यांनी मंगळवारी रात्री केलेल्या हल्ल्यात सयाप्पा अनुसे यांच्या (९ बकरी) शेळ्यांची कोकरे जागेवरच ठार झाली आहेत. मेंढपाळ सयाप्पा अनुसे बुवाचे वठार यांचे ९० हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बिरू अनुसे, सयाप्पा शिवाजी अनुसे, बिरू भीमराव अनुसे, रा. बु. वठार, युवराज बंडगर, खोची,ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, या सर्व मेंढपाळांचा शेळ्या मेंढ्यासह खतासाठी बागणी येथील शेतकरी भिमराव कृष्णा मोटे यांच्या बागणी ढवळी वाटेवर भुमापन क्र. ४७/२ब/१ नंबरच्या शेतात १ महिण्यापासून बसायला आहेत मंगळवार दिनांक ९/१/२०२४ रोजी रात्री तरसदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात ९ शेळ्यांची कोकरे ठार तर ६ बेपत्ता झाली आहेत. या घटनेमुळे अतिशय गरीब परिस्थिती असलेले मेंढपाळ सयाप्पा अनुसे खचून गेले आहेत. त्यांचे अंदाज ९० हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
हल्ल्याची घटना मेंढपाळ बिरू अनुसे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना फोनवरून कळवली संजय वाघमोडे यांनी ही घटना वनाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांना तत्काळ कळवून अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.
वनरक्षक भिवा कोळेकर बावची, वनमजुर विक्रम टिबे, विजय मदने गोटखिंडी, निवास उगळे, शंकर रकटे बावची, यांनी घटनेचा रितसर पंचनामा केला. डॉ. सचिन वंजारी पशुधन अधिकारी बावची,यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, नगमान्ना अनुसे, युवराज बंडगर, सयाप्पा शिवाजी अनुसे,बिरू अनुसे, सोमनाथ गावडे, संतोष भिमराव मोटे तसेच यशवंत क्रांती संघटनेच्या बागणी, दुधगाव, नागाव शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button