आपला जिल्हाताज्या घडामोडीप्रेरकसामाजिक

कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील जयंती निमित्तच्या जिल्हास्तरीय महिला स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील जयंती निमित्तच्या जिल्हास्तरीय महिला स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 16/7/2023 : शंकरनगर – अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट (Shri Vijay Ganeshotsav Mandal Trust च्या वतीने कै .रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (Ratnprabhadevi Mohite Patil)यांच्या 98 जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांच्या उदघाटन सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Hon. Vijaysinh Mohite Patil Ex- Deputy Chief Minister Maharashtra Gov.)
व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील (Hon. Nandinidevi Vijaysinh Mohite Patil) उभयतांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून तर प्रमुख पाहुण्या अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील (Hon. Sunita Patil, Executive Engineer PWD) यांनी प्रतिमा पूजन करून व श्रीफळ वाढवून संपन्न झाला. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च डिग्री अँड डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेज (Sakar Mahrshi Shankarrao Mohite Patil Institute of Technology and Research, Degree and Diploma Engineering) येथे दिनांक 16 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीतील दर रविवारी महिलांसाठी जिल्हास्तरीय विविध स्पर्धां होणार आहेत. आज(दि.16) रोजी उदघाटन प्रसंगी सहकार महर्षी साखर कारखान्याच्या संचालिका कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील (Hon. Swaroparani Mohite Patil) व डॉटर्स माॅम फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील (Hon. Sheetaldevi Mohite Patil, President Daughters Mom Foundation), कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले (MD Rajendra Chougule), इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे सदस्य वसंतराव जाधव (Vasantrao Jadhav), ट्रस्टच्या सदस्य फातिमा पाटावाला (Fatima Patawala),श्रीकांत राऊत(Shrikant Raut), चंद्रकांत कुंभार (Chandrakant Kumbhar), नितीन खराडे (Ad. Nitin kharade),तुकाराम भोईकर (
सेक्रेटरी अमरसिंह माने देशमुख (Amarsinh Mane Deshmukh), प्राचार्य प्रवीण ढवळे (Hon. Dr. Pravin Dhavle,Principal),प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पाटील (Pratap Patil)
आदी मान्यवर उपस्थित होते.
तर स्पर्धेदरम्यान सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील (Hon. Satyprabhadevi Mohite Patil) व माजी सभापती वैष्णोदेवी मोहिते पाटील (Hon. Vaishnavi Devi Mohite Patil) यांनी भेट दिली. इंजिनीरिंग महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार स्वरुपाराणी मोहिते पाटील (Hon. Swaroparani Mohite Patil) यांनी केला.
वय वर्ष २३ पासून पुढे असलेल्या महिलांना या स्पर्धेत सहभाग नोंदविता येत आहे. दि.16 जुलै रोजी रांगोळी, विणकाम, वक्तृत्व ,सामान्य विज्ञान या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर २७ जुलै रोजी पाककला (व्हेज,) पेंटिंग ,मेहंदी, मेकअप ,हेअर स्टाईल ,या स्पर्धा होतील दि.३० जुलै रोजी क्रिकेट, रिले ,ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी धावणे , स्मरणशक्ती या स्पर्धा होतील. दि.६ ऑगस्ट रोजी समूह नृत्य स्पर्धा व गायन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ स्मृतीभवन शंकरनगर येथे होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन अधिक गुण मिळविणाऱ्या महिलेस सर्वसाधारण विजेतेपद, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. विजय गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपराणी मोहिते पाटील (Hon. Swaroparani Mohite Patil)व डॉटर मॉम च्या अध्यक्ष सौ.शितलदेवी मोहिते पाटील (Hon. Sheetaldevi Mohite Patil, President Daughters Mom Foundation)यांचे विशेष सहकार्य लाभले डॉटर मॉम फाउंडेशन (Daughters mom Foundation &
शिवरत्न फाउंडेशन (Shivratna Foundation
व इंजीनियरिंग कॉलेज (Engineering College) यांचे सहकार्य लाभत आहे.

“प्रत्येक महिलेच्या अंगी कोणता ना कोणता तरी कलागुण असतोच. अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे मुळे त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. विजय गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेस माझ्या शुभेच्छा !”-सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील.(Hon. Nandinidevi Vijaysinh Mohite Patil)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button