ताज्या घडामोडी

ओंकार साखर कारखान्यावर महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा

ओंकार साखर कारखान्यावर महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव प्रतिनिधी :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर मोहन घोडके होते. याप्रसंगी महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्व विषद करताना रामचंद्र मगर म्हणाले महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत शेती व शेतकऱ्यांची प्रगती साधावयाची असेल तर ग्रामीण भागात उद्योग धंद्याची जोङ द्यावी लागेल. साखर कारखान्याची व इतर उद्योगाची निर्मीती झाली त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे काही बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ओंकार साखर परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांत बोञे पाटील यांनी नवसंजीवनी देऊन साखर कारखाने व उपपदार्थ प्रकल्प चालु केले त्या भागात पुर्व वैभव निमार्ण केले ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली व दळण वळण वाढले खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकण्याचे काम परिवाराने केले. या कार्यक्रमासाठी रमेश औताडे, गणेश धायगुडे, विक्रम मगर व सर्व सुरक्षा आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.या वेळी कामगारांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button