ताज्या घडामोडी

अकलूज येथे 12 मे रोजी मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

अकलूज येथे 12 मे रोजी मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/04/2025 :
“संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल” आयोजित मराठा वधु-वर सूचक केंद्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील विवाहेच्छूक वधु-वरांसाठी अकलूज ता.माळशिरस येथे 12 मे रोजी शहरातील आनंदमूर्ती मंगल कार्यालय,(अकलूज-माळीनगर रोड, छत्रपती संभाजीनगर,पंचवटी स्टॉप अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर),येथे वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक वधु-वरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या मेळाव्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी इच्छित स्थळ मिळत नसल्याने अविवाहित आहेत. वराची किंवा वधूची माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर या मेळाव्यातून प्रयत्न केला जाणार आहे.
या मेळाव्यात सहभागी झाल्याने श्रम, वेळ, पैसे,वाचणार आहेत.
या मेळाव्यात महाराष्ट्र राज्यातील आयटी,पदवीधर, इंजिनियर,डॉक्टर,व्यावसायिक,शिक्षक, शेतकरी, याशिवाय इतर विविध क्षेत्रातील उच्च शिक्षिय, अल्प शिक्षित वधू वर, याशिवाय घटस्फोतीत वधू वर मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
त्याचे पहिले पाऊल सोलापूर जिल्ह्यात या वधूवर महामेळाव्याने उचलले आहे.
अनेक पालकांनी वधूवर मेळावा घेण्याची विनंती केल्याने समाजाच्या आग्रहाखातर या मेळाव्याचे आयोजन केले आहे.याशिवाय मराठा वधू वर सूचक केंद्र या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून देखील हे कार्य सुरु आहे.मेळाव्यात सहभागी होऊन, आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट करू शकतो.याशिवाय उपस्थित असलेल्या इतर लोकांकडून आपण जोडी निवडण्याबद्दल चर्चा करू शकतो. आणि योग्य निर्णय घेऊ शकतो.वधू-वर परिचय मेळावे हे विवाह इच्छुक व्यक्तींसाठी एक चांगला पर्याय आहे, जो त्यांना योग्य जोडी निवडण्यास मदत करतो. ज्यामुळे संस्कृतीचा आदर होतोआणि समाजाला एकत्र आणण्यास मदत करते.
इच्छुक वधू-वर किंवा त्यांच्या पालकांनी या वधूवर मेळाव्यात सक्रिय सहभाग घेऊन विवाहच्छूक वधु-वरांची नावनोंदणी करावी. तसेच गैरसोय टाळण्यासाठी मेळाव्याला येण्यापूर्वी संपर्क साधावा.
आधिक माहिती व नाव नोंदणी साठी
गणेश जाधव (7841847458),, रणजितदादा गायकवाड (7028873111), अमर जाधव (9890565151), अभिजित बाबर (7507655055) यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button