ताज्या घडामोडी

पोट फाटे नी मया सुटे!
कीं माता नच तु वैरीणी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 18/01/2024 :
अहिराणी भाषेत एक म्हण आहे. “पोट फाटे नी मया सुटे!” याचा अर्थ असा आहे कीं, एखादी स्त्री कितीही निष्ठुर असू द्या, क्रूर, कठोर असू द्या. पण ती जेंव्हा आई होते, तिच्या पोटातून पोट फाडून जो जीव जन्माला येतो, ते तीच बाळ असत. हे बाळ जन्माला येत तेंव्हा तिच्यात बदल घडतो, तीच्यातील निष्ठुर, क्रूर, कठोर स्त्री मरते आणि त्या जागी एक वात्सल्य सिंधू आई, प्रेमाचा सागर प्रकट होते. ती माता.
खरं तर हे सर्वं घडवून आणणारा ईश्वर आहे. कोणी त्याला निसर्ग म्हणेल. या ईश्वरानें वा निसर्गाने ही सृष्टी निर्माण केली. त्यात असंख्य जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी, जलचर, भुचर निर्माण केले. मोहक वनराई तयार केली. त्यात, झाडे, वेली, फळे, रंगींबिरंगी फुले, पाने तयार केली. त्यांची संख्या करोडोत आहे. या करोडोची विन टिकून रहावी. पिढी दर पिढी यांचं अस्तित्व टिकून रहावे या हेतूने प्रत्येक मादीच्या हृदयात परेमेश्वरानें प्रेम वात्सल्य निर्माण केले. जेणे करून तीच पिल्लू संज्ञान होई पर्यंत मातेने त्याचं संगोपन कराव. पुढच्या पिढीचा वारसा टिकावा. म्हणून देवाने मातृ हृदयात हां वात्सल्य झरा निर्माण केला. काही झालं तरी हां झरा आटत नाही. हां पाझर सुरु आहे तो पर्यंत भित्री हरणी सुद्धा आपलं पाडस वाचविण्यासाठी सिंहासी टक्कर घेते. ते वात्सल्य प्रत्येक मातेत खच्चून भरलेल आहे. म्हणूनच आपण म्हणतो मातृ देवो भव. तस पितृ देवो भव आणि गुरु देवो भव असंही म्हणतात. पण पितृत्व आणि गुरुत्व ही कमावलेली असतात. स्वीकारलेली असतात. हे नातं बौद्धिक आहे. पण मातृ देवो भव हे नातं उपजत असत. नैसर्गिक असत. हे नातं हार्दिक असत.
अशा या विश्वातील श्रेष्ठ मातृत्व नात्याला काळीमा फासणारी घटना परवा घडली. सूचना शेठ नावाच्या एका महिलेने आपल्या चार वर्ष वयाच्या बाळाची क्रूरपणे हत्या केली.ही महिला 39 वर्ष वयाची आहे. म्हणजे अल्हळ नाही. पूर्ण प्रौढ, पोक्त आहे. उच्चं जाती वर्गातील उच्चं विद्या विभुषीत आहे. एका खाजगी कंपनीत सीईओ आहे. स्वतःची गाडी ड्रायवर ठेवू शकते एवढी ती श्रीमंत आहे. अशा या अभिजन वर्गातील सुसंस्कारीत कीं कूसंस्कारीत महिलेनें आपल्या चार वर्ष वयाच्या निरागस निरपराध बाळाची नियोजन बद्ध कट रचून अगदी थंडपणे हत्या केली. मातृत्व नात्याला काळिमा फासली.पोटच्या गोळ्याची हत्या करताना तीला काहीही वाटलं नाही. तिचा हात यात्कीनचितही कापला नाही कीं डोळ्यातून एक अश्रू ओघळला नाही. या हत्ये मागच कारण पुढे आल आहे. या महिलेच तिच्या नवऱ्यासी पटत नव्हत. म्हणून मग तीने घटस्फ़ोट घ्यायचे ठरविले. ते विभक्त राहात होते. दोघ न्यालयात गेले. न्यायालयांने मुलांचा ताबा आईकडे दिला पण बापाला भेटण्याची मुभाही दिली. मुलाच्या बापा बद्दल मुलाच्या आईच्या मनात इतका तिरस्कार होता कीं, पिता पुत्राच्या भेटी नंतर पित्याला मिळणारा आनंद मिळू नये म्हणून पिता पुत्राची भेटच होऊ नये हां विचार करून तीने पुत्राची हत्या केली. हा जगातील सर्वात क्रूर मूर्खपणा ठरला आहे. तीला जनावर म्हणनें हां जनांवरांचा अपमान आहे. पोटच्या गोळ्याच्या मानेवर आपण सूरी फिरत आहोत याच तीला यतकिंचित ही दुःख वाटलं नाही. दुसरं कारण असं कळलं कीं, मुलांचा चेहरा बापा सारखा होता. तिचा गुन्हा पकडला गेला. कायद्या प्रमाणे तिला फाशी किंवा जन्मठेप होईल सुद्धा. कदाचित तीला मनोरुग्ण ठरवून अल्प शिक्षा करून सोडूनही देतील. कायद्या प्रणाने तीला जी शिक्षा व्हायची ती होईल. पण तीने मातृ वात्सल्यावर जो कलंक लावला आहे त्यांन सर्वं संवेदनशील जगाला रडायला भाग पाडल आहे. मराठीतील एक म्हण दुर्दैवाने तीने खरी ठरविली आहे.
माता नच तु वैरीण!
कदाचित तीला फासी झाली नाही आणि तिच्या छातीच्या पिंजऱ्यात हृदय नावाची काही चीज असेल तर ती पुढच आयुष्य कसं जगेल? तीला बाळाची आठव येईल कां?

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button