पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यास जन्मठेप तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यास जन्मठेप तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/04/2025 : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला असून मुख्य आरोपी इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यास जन्मठेपेची सजा ठोठावण्यात आली. इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर याने पोलिस दलातील अनुभवाचा फायदा घेत हे प्रकरण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. कुरुंदकर सोबतचे दोन सह आरोपी कुंदन भंडारी आणि फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह पोलीस दलाचेही लक्ष लागले होते. पनवेल येथील सत्र न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांनी या खटल्याचा निकाल आज जाहीर केला.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेचे अपहरण, हत्या तसेच वुडकटरने शरीराचे तुकडे करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने इन्स्पेक्टर अभय कुरुंदकरला तसेच त्याचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. या घटनेतील तपासात अक्षम्य दुर्लक्ष केल्याने कोर्टाने नवी मुंबई पोलीस दलातील तपास अधिकारी कोंडीराम पोपरे, सुरवशे, तुषार जोशी, प्रकाश निलेवाड, सीपी हेमंत नगराळे यांच्यावरही ठपका ठेवला.