“बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनाईजर”,इंडीया रूग्णांसाठी मसिहा

“बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनाईजर”,इंडीया रूग्णांसाठी मसिहा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/04/2025 : आपणास माहीत असलेले आठ ब्लड ग्रुप A B AB O पॉजीटीव व A B AB O निगेटीव हे माहीतीस असलेले आठ ब्लड ग्रुप हे सोडून जगात सर्वात दुर्मिळ रक्तगट त्यांचे नांव “बॉम्बे ब्लड ग्रुप” भारता मध्ये 180 तर जगामध्ये फक्त 420 लोंकाचा हा रक्तगट व हे रक्त कोणत्या ही ब्लड बँकेत सापडत अथवा मिळत नाही. बॉम्बे ब्लड ग्रुप हा O +ve मध्ये सापडतो. बॉम्बे ब्लड ग्रुप O +ve रक्तगटा मध्ये H एटीजन हा फँक्टर नसून यांचा शोध 1952 साली Kem हॉस्पीटल मुंबई डॉक्टर भेंडे यांनी लावला म्हणून यास बॉम्बे ब्लड ग्रुप असे देणेत आले.
अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रहीवासी पेशन्ट सौ.शिवाणी पिसे या महीलेस उपचारा वेळी हॉस्पीटल मध्ये अँडमिट होताच त्यांचा रक्तगट हा “बॉम्बे ब्लड ग्रुप” निदर्शनास आला परतू हे ब्लड कुठे ही मिळत नाही हे पाहील्या नंतर शौशल मिडीयाचा वापर करणेत आला असता न्युज वरील बातमी व हैल्पलाईन पाहणी वरून सांगली जिल्हा तासगांव रहीवासी विक्रम विश्रांत यादव यांचा बॉम्बे ब्लड ग्रुप हैल्पलाईन नंबर
99 7001 8001 वरती कॉल करताच किणी गांवचे महेश पाटील यांनी आज सांगली मध्ये रक्तदान केले व ते ब्लड बाय कार सांगली ते वेळापुर काही तासात रूग्णा पर्यन्त पोच केले व पुढील उपचार करणेत आले. वेळे वर रक्त मिळाले व उपचार करणेत आले.
हॉस्पीटल स्टॉप व नाते वाईक यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनाईजर,इंडीया अध्यक्ष विक्रम यादव व रक्तदाते महेश पाटील यांचे आभार मानले.