भाळवणी येथील युनियन बँकेचे नूतन शाखाधिकारी बालाजी हारके यांचे स्वागत

भाळवणी येथील युनियन बँकेचे नूतन शाखाधिकारी बालाजी हारके यांचे स्वागत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
पंढरपूर प्रतिनिधी :
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी (तालुका पंढरपूर) च्या नूतन शाखाधिकारीपदी बालाजी हारके यांची नेमणूक झाली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन निहाल शेख, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माळवदे, विवेक भोरे, परेश वाळवणी, अशोक गुरव, बापू वाघमारे उपस्थित होते.
यावेळी सरपंच रणजीत जाधव म्हणाले की येथील , परिसरातील बँकेचे ग्राहक आपणास सर्व ते सहकार्य करतील आणि बँक ग्राहकांचे सर्व प्रश्न चर्चेतून लवकरच मार्गी लागतील. याकरिता ग्रामपंचायतीचे वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही जाधव म्हणाले.
यावेळी शाखाधिकारी हारके म्हणाले आजपर्यंत बँक ग्राहकांनी जे सहकार्य केले आहे.असेच सहकार्य राहू द्यावे.निश्चितपणानेच खातेदारांचे सर्व प्रश्न सोडवले जातील.