मगरीच्या हल्ल्यात बोकड ठार. कांदे तालुका शिराळा येथील घटना

एक कॉल.
प्रॉब्लेम सॉल.
मगरीच्या हल्ल्यात बोकड ठार.
कांदे तालुका शिराळा येथील घटना
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
- अकलूज दिनांक 28/04/2024 :
कांदे : वारणा नदीच्याकाठी शेळ्या मेंढ्या चरत असताना मगरीने केलेल्या हल्ल्यात बोकड जागीच ठार झाले. या घटनेत मेंढपाळाचे वीस हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ प्रशांत बंडगर व शिवाजी सिद्ध रा. सागाव ता. शिराळा जिल्हा सांगली हे दोघे उन्हाळ्यात गावी चारा नसल्याने आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन चारणीसाठी कांदे ता. शिराळा येथे वास्तव्यास आहेत.
गुरुवार दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी तीन वाजता शेळ्या मेंढ्या नदीकाठाने हिंडत असताना एक बोकड पाणी पिण्यासाठी पाण्याजवळ जाऊन पाणी पिऊ लागले…अचानक पणे पाण्यात लपून बसलेल्या मगरीने बोकडावर हल्ला केला व बोकड पाण्यात ओढून घेऊन जाऊ लागली. हि घटना मेंढपाळांच्या समोरच घडत होती. परंतु मेंढपाळांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा सुरू केला व पाण्यात दगड मारू लागले आरडा व पाण्यात होत असलेल्या दगडाचा मारा यामुळे मगर बोकड सोडून पाण्यात गेली.. परंतु बोकडाचा पाण्यातच मृत्यू झाला.. मेंढपाळाने काठीच्या सहाय्याने बोकड नदीकाठी आणले.
या घटने संदर्भात यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे यांनी कांदे येथील वनरक्षक हणमंत पाटील व वाळवा तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश जाधव व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोकले यांना कळविले. वनरक्षक हणमंत पाटील व वनमजुर संभाजी कंत्राटदार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला.डॉ. पोकले यांनी मृत बोकडाचे शवविच्छेदन केले. घटनास्थळी ऐतवडे शाखाध्यक्ष नाना घोडके व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
“वारणा व कृष्णा नदीच्या काठावरील शेतकरी व मेंढपाळ यांनी नदीच्या काठावर किंवा नदीत उतरताना सावधानता बाळगावी” असे आवाहन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी यावेळी केले.