समजा तुम्हाला कोण थोबाडीत मारली तर ?
समजा तुम्हाला कोण थोबाडीत मारली तर ?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/04/2025 :
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या उरल सुरल या पुस्तकात समजा तुम्हाला कोण थोबाडीत मारली तर असा ललित लेख आहे.
हा लेख मी आतापर्यंत किमान शंभर वेळा वाचला आहे प्रत्येक वेळी पुर्नप्रत्ययाचा आनंद व विनोदाची नवीन जागा सापडते.
ज्या कोणी वाचक बंधू भगिनींनी हा लेख वाचला नसेल तर त्यांनी तो आवर्जून वाचावा.
अनावश्यक शक्तिसंचयाबद्दल एक योग्य आणि विचार करायला लावणारा मुद्दा या विनोदी लेखात सापडतो.
माझ्या आजच्या लेखाचे शीर्षक आहे
समजा तुम्हाला कोण आई वरून शिवी दिली तर?
आपल्या देशात ज्यावेळी आणीबाणी लादली होती सर्व मूलभूत हक्क हे स्थगित करण्यात आले होते त्यावेळी कोणीही विचारवंत व तथाकथित पुरोगामी यांनी आवाज उठवला नाही.
पण आता 20 14 साल पासून आपल्या देशात अनेक तथाकथित पुरोगामी विचारवंत हे काँग्रेस गवतासारखे उगवले आहेत.
शासन, पंतप्रधान, राष्ट्रपुरुष व हिंदूत्ववादी यांच्या बद्दल काहीही लिहायचे काहीही बरळायचे व आम्हाला संविधानाने हा हक्क दिला आहे असे छातीठोकपणे सांगायचे असे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत. त्यातून अशा कोणा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली की अनेक राजकीय नेते, पत्रकार व सोशल मीडियावरील स्वयंघोषित विचारवंत त्वरित पेटून उठतात व संविधान संविधान म्हणत आम्ही म्हणतोय बरोबर आहे, आम्हाला ऊच्चार स्वातंत्र्य आहे असा कागावा सुरू करतात.
दुर्दैवाने आमच्या देशाच्या न्यायप्रणालीत सुद्धा काही चुकीच्या संकल्पना असल्याने अशा तथाकथित विचारवंत यांच्या विचार स्वातंत्र्याला संरक्षण दिले जात आहे.
*समजा मला कोणी आईवरून शिवी दिली तर ती मी सहन करायची काय? माझी संस्कृती व माझे संस्कार मला त्याच्या भाषेत त्याच्या आई वरून शिवी देण्याचे परवानगी देत नाहीत व तशी माझी संस्कृती नाही मग मी काय करायचे या शिव्या सहन करायच्या का पळून जायचे? मी जर एकदा पळून गेलो तर शिवी देणारे यांचा आत्मविश्वास वाढेल व ते आणखीन पुढच्या वेळी गलिच्छपणा करतील. मग हे थांबवायचं असल्यास काय करायचे
अदखलपात्र गुन्हा
जर मी मला आई वरून शिवी दिली म्हणून पोलीस स्टेशनला गेलो व तक्रार केली तर पोलीस मला सांगतील शिवीगाळ हा अ दखलपात्र गुन्हा आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाऊन केस करा.
आज आपल्या देशात लाखो नव्हे करोडो केसेस पेंडिंग असताना मला दिलेली शिवी याची केस सुमारे आठदहा वर्षे आरामात चालेल. मी माझे काम, श्रम, पैसा, वेळ सगळे खर्च करून या शिवीच्या उत्तरासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहायच्या का हा मोठा प्रश्न आहे.
ऐशा नरास मोजूनी माराव्या पैजारा
मग मी काय करावे
जसे शिवी देणार याला उच्चार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे तसे मला प्रतिकार स्वातंत्र्य नाही का?
अशावेळी मी राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या विचाराशी सहमत होऊन त्यांच्या मार्गाने जाईल. तुकाराम महाराज म्हणाले होते “ऐशा नरास मोजूनी माराव्या पैजारा”
जशी उच्चार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य ही सप्त स्वातंत्र्य आहेत ही तुम्हाला आहेत तशी पुढच्या माणसाला पण आहेत व तो कोणीही असो याचे भान या तथाकथित पुरोगाम्याना नाही व यांना कोर्टामधील केस व फौजदारी कारवाई यामुळे काही फरक पडणार नाही.
ज्या दिवशी याच्या उच्चार स्वातंत्र्यांचा राग येऊन पुढचा आपल्या पायातले हातात घेऊन याच्या डोक्यात हाणेल याची भीती याना वाटणार नाही तोपर्यंत हे तथाकथित पुरोगामी व तथाकथीत विचार स्वातंत्र्य वाले असेच वागणार.
एडवोकेट अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी