शिवशंकर वि. का. से. सोसायटी, मळोली चेअरमन व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध

शिवशंकर वि. का. से. सोसायटी, मळोली चेअरमन व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 07/04/2025 : शिवशंकर विविध कार्यकारी सेवा सोसायटी,मळोली(पाटील वस्ती) या संस्थेच्या नुतन चेअरमनपदी चंद्रकांत रामचंद्र जाधव यांची तर व्हॉइस चेअरमन पदी भानुदास नारायण तुपे यांची बिनविरोध पदी निवड करण्यात आली. यावेळी माजी चेअरमन जयराम महादेव जाधव व व्हा. चेअरमन सौ. सुरेखा रविंद्र फडतरे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी राऊत व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, मळोली शाखेचे बँक इन्स्पेक्टर चौगुले उपस्थित होते. वरील पदाधिकारी यांचा सत्कार मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी मारुती जाधव, जेष्ठ संचालक जगन्नाथ तुकाराम जाधव, दत्तात्रय नानासो जाधव पाटील, हनुमंत शिवाजी जाधव व श्री. हनुमंत निवृत्ती घोरपडे, यांच्या शुभहस्ते पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.