ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सहकारातील सत्तेसाठी पाशवी वापर सुरू – पृथ्वीराज जाचक 

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सहकारातील सत्तेसाठी पाशवी वापर सुरू – पृथ्वीराज जाचक 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भा. नायकुडे
मुंबई दिनांक 03/04/2025 :
“महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सहकार असो किंवा इतर क्षेत्रातील सत्तेचा पाशवी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. ते म्हणाले की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात कायदेशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगर इंदापूर जिल्हा पुणे या कारखान्याची निवडणूक घेत असल्याचा असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व छत्रपती चे माजी संचालक चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.
छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कारखान्याचा पोटनियम व सहकार कायद्यानुसार मतदार यादी करावी अशी आमची मागणी होती, मात्र तीन वेळा सदोष मतदारयादी बनवली गेली. त्यावरून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर सुनावण्या होऊन कारखान्याच्या मतदारयादीसंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल दिला, हा निकाल गुणवत्तेवर आधारीत नाही हे सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, त्याची पहिली सुनावणी देखील दोन दिवसांपूर्वी झाली, या सुनावणीस छत्रपती कारखान्याचे वकीलही ऑनलाईन उपस्थित होते, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आमचे म्हणणे ऐकून घेत पुढील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे. असाही आतापर्यंत कारखान्याच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा अतिरिक्त कालावधीही संपलेला आहे, अशावेळी आता केवळ आठ ते दहा दिवसांची प्रतिक्षा करायला काही फरक पडत नव्हता. पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोचले असल्याची माहिती असतानाही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास निवडणूकीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप जाचक यांनी केला.
छत्रपती कारखान्याची आजची अवस्था होण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे समर्थक संचालक जबाबदार आहेत, सहकार क्षेत्रातलं वाटोळ करून सहकार क्षेत्र हस्तगत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनच राज्यातील सत्तेचा पाशवी वापर करून सर्व आयुधे वापरून छत्रपती साखर कारखान्याच्या सत्तेसाठी लोकशाहीविरोधी काम केले जात असल्याचा आरोप जाचक यांनी केला. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वोच्च न्यायालयालाही जुमानले जात नसल्याने सरकारमध्ये नेमके काय सुरू आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अत्यंत भ्रष्टाचाराची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या समर्थक संचालकाची आतल्याचा गंभीर आरोप करत, उपमुख्यमंत्र्यांकडुन सत्तेसाठी कायद्याचा व पदाचा पाशवी वापर करत दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप जाचक यांनी केला आहे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button