ताज्या घडामोडी

स्नेह मेळाव्याचा उडाला फज्जा – डी.एस. गायकवाड

स्नेह मेळाव्याचा उडाला फज्जा – डी.एस. गायकवाड

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 24/11/2023 :
“न विचारताच टाकलेली भाजपातील वरिष्ठ मान्यवरांची निमंत्रण पत्रिकेतील नावे, आपल्या भाषणात बंगल्यावर न जाण्याची केलेली त्यांची घोषणा आणि लोकांनी फिरवलेली पाठ यामुळे नातेपुते येथे झालेला स्नेहभोजन सोहळा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आणखी खोलात नेणारा ठरणार असून त्यातच त्यांनी आपल्या भाषणात केलेली राष्ट्रवादीच्या नेत्याची स्तुती भाजपातील उपस्थित नेत्यांच्या पचनी पडताना दिसली नाही. यामुळे स्नेहभोजनाने ढेकर येण्याऐवजी अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावरील कालवा कालव मात्र लपून राहिली नाही.”
– खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नातेपुते येथे दीपावली स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते मात्र अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने हा मेळावा फसला… एवढेच नाही तर अनेक लोकांनी देखील याकडे पाठ फिरवली आणि खासदार साहेबांची पुरती वाट लागल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. दिवाळीच्या फराळ च्या नावाखाली दीपावली स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन नातेपुते येथे मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. अनेक मान्यवर नेतेमंडळींची नावे न विचारताच निमंत्रण पत्रिकेवर टाकून स्नेह मेळावा टोलेजंग करण्याचा मानस आखण्यात आला होता… पण पुरता प्लॅन फसला आणि लोकांनी याकडे पाठ फिरवली… अनेक नेते मंडळी देखील या कार्यक्रमात सहभागी झालेली दिसली नाहीत. त्यामुळे याचीच चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आहे. मुळात यापूर्वी असा स्नेह मेळावा आयोजन करण्याचे सुचले नाही आणि आत्ताच हा घाट कशासाठी घालण्यात आला होता हे लपून राहिले नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन या स्नेहभोजनाचे आयोजन केल्यामुळे लोकांनी पूर्णपणे याकडे पाठ फिरवली.. जी मंडळी या ठिकाणी आली होती त्यांनाही गाड्यासाठी पैसे दिले होते अशीही सुप्त चर्चा सध्या मतदारसंघात रंगताना दिसत आहे. मंगल कार्यालयाच्या नावाप्रमाणेच मधुर मिलन व्हावे या उद्देशाने खासदार नाईक निंबाळकर यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते मात्र पाठीमागील काळात केलेल्या चुकामुळे मधुर तर सोडाच पण आणखी कटूता निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणारे श्रीकांतजी भारतीय यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने विद्यमान खासदारांची २०२४ च्या उमेदवारीसाठी नुसतीच लुडबुड चालू असल्याचे स्पष्टपणे जाणवले. पाठीमागील चार वर्षाच्या कार्यकाळात खासदार नाईक निंबाळकर यांना जनतेशी संवाद साधता आला नाही आणि आत्ताच ते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधताना दिसत आहेत. हे आता लोकांनी पुरते ओळखलेले दिसत आहे..आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी बंगल्यावर जाणार नसल्याचा उल्लेख केला. शिवरत्न बंगला हा तर मोहिते पाटील समर्थकांसाठी नेहमीच श्रद्धास्थान राहिलेला आहे आणि शिवरत्न चा आदेश पाळूनच समर्थकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला होता पण आता त्यांच्या वक्तव्याने दुखावलेले मोहिते पाटील समर्थक आणखी सतर्क झालेले दिसत आहेत.त्यांच्यावर आता कुणी दबाव टाकू शकत नाही…आपसूकच ते लोकशाही मार्गाने त्यांच्या नेत्याचे नाव पुढे करतील यात शंका नाही.आणि आपल्या हक्काचा खासदार भाजपामधून आणण्याचा प्रयत्न करतील त्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एक तर खासदारांच्या वाढलेल्या राजकीय खोड्या आणि त्यातच शिवरत्न बंगला या अस्मितेवर केलेल्या टिप्पणीमुळे मोहिते पाटील समर्थक बरं झालं म्हणत लवकर आपला खरा चेहरा पाहायला मिळाला आता मात्र सुट्टी नाही अशा भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
त्यामुळेच सदरील स्नेहभोजनाचा कार्यक्रम फसला आहे असेच यानिमित्ताने म्हणता येईल…भाजपाची माढा लोकसभा मतदारसंघात ताकद आहे… ती ताकद अशा जेवणावळी देऊन वाढलेली नाही तर या पाठीमागे कष्ट, परिश्रम आणि त्याग आहे… यासाठी कोण झिजत आहे हे जनतेला सांगण्याची गरज नाही… त्यामुळे आयत्या बिळात नागोबा दुसऱ्यांदा चालणार नाही असा लोकांमधून संवाद ऐकू येताना दिसत आहे… माळशिरस तालुक्याच्या विद्यमान आमदारांना देखील खासदार नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे नाराज केले आहे. त्यांनी पोस्ट टाकून जनतेचे आमदार…(…) म्हणून विद्यमान आमदारांना हिणवले आहे… म्हणूनच आमदार राम सातपुते यांनी देखील खासदार निंबाळकर यांना दूरच ठेवलेले दिसत आहे… असो ज्या उद्देशाने स्नेहभजनाचे आयोजन केले होते त्यात खासदार निंबाळकर हे सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे…आणि याची चर्चा सध्या सर्व दूर सुरू असताना दिसत आहे.. खासदारांना जनतेबरोबरच नेत्यांनी देखील कसे नाकारले आहे हेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरून सिद्ध झाले आहे इतकेच…

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button