सोनाली मंडलिक ठरली “रत्नत्रय महिला केसरी 2025” ची मानकरी 🟩 अनंतलाल दोशी अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महिला कुस्ती दंगल.

🟦 सोनाली मंडलिक ठरली “रत्नत्रय महिला केसरी 2025” ची मानकरी
🟩 अनंतलाल दोशी अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महिला कुस्ती दंगल.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/7/2025 :
रत्नत्रय महिला केसरी 2025 ची महाराष्ट्रात प्रथम एका महिलांच्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले. कुस्ती मैदानाचे उद्घाटन सहकार महर्षि साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या कुस्तीसाठी विविध भागातून 200 महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावली. कुस्तीसाठी ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा सौ शितलदेवी मोहिते पाटील उपस्थित होत्या. बोलताना त्या म्हणाल्या की आपण माझ्या मुलींसाठी कुस्त्याचा उपक्रम चालू केला आहे तो फारच छान आहे त्याबद्दल दोशी कुटुंबाचे आभार मानते. अकलूजच्या कुस्तीनंतर पहिल्यांदा आपण मुलींसाठी मैदान भरवले याचा मला अभिमान वाटतो. पुढे त्या म्हणाल्या की महिला देखील कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत तर कुस्तीतच का मागे त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पुढे आले पाहिजे ग्रामीण भागातील मुली नॅशनल व इंटरनॅशनलला जातात परंतु त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. कुस्तीतील मुलींसाठी सरकारी कामासाठी नोकऱ्यांत प्राधान्य देण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहणार आहे प्रत्येक कुस्ती खेळणाऱ्या मुलींनी आपले ध्येय मोठे ठेवावे, त्यासाठी आपल्या घरात ऑलम्पिक चे चित्र लावून दररोज सराव करावा दंगल पिक्चर झाल्यापासून मुलींचे कुस्ती क्षेत्रात भाग घेण्याचे प्रमाण वाढले व त्यांच्या कुस्ती कडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातून बदलला गेला सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी जी पहिली कुस्ती स्पर्धा भरवली होती त्यास 2026 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त 2026 मध्ये महिला व पुरुष महाराष्ट्र केसरी अशा दोन्हीही कुस्ती स्पर्धांचे नियोजन अकलूज मध्ये द्यावे अशी मागणी कुस्तीगर संघटना यांच्याकडे केलेली आहे.
रत्नत्रय महिला केसरी साठी अंतिम लढत पै. सोनाली मंडलिक विरुद्ध पै. सिद्धी होळकर यांच्यामध्ये अटीतटीच्या लढतीत क्लजीन डावावरती पै. सोनाली मंडलीकने रत्नत्रय केसरीच्या किताबाचा मान पटकावला . यासाठी तिला एक लाख रुपये व चांदीची गदा सन्मानचिन्ह देऊन सौ शितलदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तिचा सत्कार करण्यात आला यासाठी पंच म्हणून पै. नारायण माने यांनी काम पाहिले व दोन नंबरच्या कुस्तीची लढत पहिलवान धनश्री फंड विरुद्ध पै. अहिल्या शिंदे यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटांची कुस्ती चालली नंतर पंचांनी कुस्ती गुणांवर लावली त्यामध्ये पै. धनश्री फंड हिने गुणांवर विजय मिळवला तिला 75000 रुपये रोख, चांदीची गदा व सन्मान चिन्ह देऊन सौ शितलदेवी मोहिते पाटील यांचे शुभहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यासाठी पंच म्हणून पै. सुहास तरंगे यांनी काम पाहिले.
या वेळी मिहीर गांधी ,देविदास ढोपे, सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच वीरकुमार दोशी, रत्नगिरी स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, महावीर शहा, विष्णू भोंगळे, उदय सतीश बनकर, कुस्ती स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पै. रामदास गोफणे पै. विठ्ठल अर्जुन पै. सुरेश धाइजे व ज्ञानेश राऊत यांनी काम पाहिले.