ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद यांचे विरोधात जाहीर उपोषणास प्रारंभ.

मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद यांचे विरोधात जाहीर उपोषणास प्रारंभ.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/02/2024 :
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास प्रारंभ झाला.समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी अर्थात पिछडा आयोग दिल्ली) यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून    उपोषणास प्रारंभ केला. पुष्पहार अर्पण करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड, सुनील ज्ञानेश्वर कांबळे, सौ सखुबाई सदाशिव धाईंजे, सुरेखा राजेंद्र लोंढे, सौ विजया पांडुरंग गायकवाड, संजय मनोहर गायकवाड, राजू रामा जाधव, सदाशिव ज्ञानोबा धाईजे, प्रतिभा विलासनंद गायकवाड, बाबासाहेब गुलाब गायकवाड, युवराज सदाशिव धाईंजे, कबीर बाळासाहेब कदम, पिंटू सूर्यवंशी, कन्हैया रामचंद्र साळुंखे, अभिजीत बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत विश्वनाथ खरात, सागर सिद्धार्थ जगताप, लक्ष्मण भगवान बनसोडे, अशोक सुखदेव कांबळे, अंकुश कांतीलाल धाईंजे, उमेश मुरलीधर जगताप, महादेव श्रीरंग ओवाळ, आदिनाथ मोहन जाधव, सुनील तानाजी साठे भारत महादेव वाघमारे श्रीमती लोचना मोहन जाधव राजू अंगद गायकवाड, महावीर गायकवाड, विनायक आगतराव गायकवाड, अशोक राजेंद्र सलमपुरे, प्रदीप तानाजी धाईंजे, इत्यादी उपस्थित होते.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अकलूज येथील सिटी सर्वे नंबर 987/61 मधील (तत्कालीन दि बॅकवर्ड क्लास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी अकलूज ) रस्त्यावरील व खुल्या जागेतील अनधिकृत अतिक्रमण संदर्भात जाणीवपूर्वक केलेल्या चाल ढकलीच्या विरोधात मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर यांना दिनांक 8/2/2024 रोजी समक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 26 /2 /2024 पासून उपोषणास सुरुवात झाली आहे.
मा. जिल्हाधिकारी सोलापूर व मा.तहसीलदार माळशिरस यांचे आदेशान्वये या जागेवरती महाराष्ट्र शासनाची नोंद झालेली आहे. त्यानुसार अंतर्गत रस्ते व खुल्या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढणे. तत्कालीन दि बॅकवर्ड हाऊसिंग क्लास को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी चे ले-आउट नकाशा प्रमाणे रस्ते व गटारी करून देणे. अंतर्गत रस्त्यातील अनधिकृत जागेतील अतिक्रमित लोकांचे पुनर्वसन करणे. सर्व सभासद व बिगर सभासद यांना रमाई घरकुल तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ देणे
(थोडक्यात सध्या येथे वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत घरकुल बांधून देण्यात यावीत ) इत्यादी मागण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
यानुसार प्रत्यक्ष कारवाई सुरू करून येथील नागरिकांना न्याय व त्यांचा हक्क मिळवून द्यावा आणि दलितांचा वर्षांनुवर्षै गुदमरलेला श्वास रिकामा करावा आणि नागरी सुख सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या दलित बांधवांना नागरी सुख सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करणारे निवेदन समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड अकलूज, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ मोहन जाधव अकलूज,
यांनी जिल्हाधिकारी सो सोलापूर यांना दिलेले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button