जस्ने ईद-ए-मिलाद निमित्त K.G.N. ग्रुप शिवतेजनगर तर्फे भव्य अन्नदान सोहळा संपन्न

जस्ने ईद-ए-मिलाद निमित्त K.G.N. ग्रुप शिवतेजनगर तर्फे भव्य अन्नदान सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक23/9/2024 : सालाबाद प्रमाणे जस्ने ईद-ए-मिलाद निमित्त K.G.N. ग्रुप शिवतेजनगर-यशवंतनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) यांच्या तर्फे भव्य अन्नदान सोहळा संपन्न झाला.
शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी अतिभव्य स्वरूपात संपन्न झालेला अन्नदान सोहळा यशस्वी करण्यासाठी K.G.N. ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अत्यंत परिश्रम घेतले. हिंदू मुस्लिम आम्ही सर्व बांधव एकोप्याने राहतोय हे या अन्नदान सोहळ्यावरून निदर्शनास आले. गत दहा वर्षापासून K.G.N. ग्रुपच्या वतीने अन्नदान सोहळा राबविण्यात येत असल्याची माहिती सांगून ग्रुपचे अध्यक्ष इन्नुस फतरूमियाॅ सय्यद यांनी अन्नदान सोहळ्याप्रसंगी सर्व उपस्थितांचे आभार मानले.