ताज्या घडामोडी

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाचे घवघवीत यश

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाचे घवघवीत यश

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/03/2025 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संगणक शास्त्र संकुलाच्या वतीने “डेक्स्टर इनोफेस्ट 2024 – 25” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाच्या बीएससीएस भाग दोन च्या विद्यार्थिनी कुमारी अदिती पराडे व कुमारी भूमिका मगर यांनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या विषयावर सर्वोत्तम सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला .
या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या 298 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये कोडिंग स्पर्धा ,पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा चा समावेश होता .
पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये संगणक क्षेत्रातील विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून पोस्टर तयार केले व त्याचे सादरीकरण केले .
यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स , मशीन लर्निंग, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, काँटम कम्प्युटिंग इत्यादी विविध संगणक क्षेत्रातील विषयांचा समावेश होता .
या स्पर्धेचे उद्घाटन संगणक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉ . आर.एस. मेंते यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेमधील विजेत्यांचे अभिनंदन व बक्षिस वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महारनवर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद माने यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.


या स्पर्धेमध्ये आर. एम. पवार, एस. एस. शाकापुरे, यू.एस. दोडमिसे व के. एस. काझी यांनी परीक्षकांचे काम पाहिले .
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संगणक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर. एस. मेंते,डॉ.जे.डी. माशाळे, डॉ. ए. आर. शिंदे, डॉ. एस. डी. राऊत, प्रा. सी .जी .गार्डी चौगुले यांनी विशेष काम पाहिले .
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संगणकशास्त्र सह अनेक महाविद्यालयाने त्यामध्ये उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला होता .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शिंदे व सर्व विभाग प्रमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व संघ प्रमुख प्राध्यापिका धनश्री हातोळकर यांचे अभिनंदन केले व सर्वांना सन्मानित केले .

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button