आजही महिला असुरक्षित : प्रा. गुलनास मुजावर यांची खंत

आजही महिला असुरक्षित : प्रा. गुलनास मुजावर यांची खंत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
कोडोली ( ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ) / प्रतिनिधी : ” आज महिलांनी विविध क्षेत्रांत भरारी घेतली आहे. आज पूर्वीइतक्या त्या समाजाच्या बंधनात नसल्या तरीही त्या पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या नाहीत. आजचे महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहता आजही महिला असुरक्षित आहेत “, अशी खंत प्रा. गुलनास कमरुद्दिन मुजावर यांनी महिला दिनाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना व्यक्त केली.
येथील यशवंत शिक्षणशास्त्र बी. एड. महाविद्यालयात पुरुष विद्यार्थी – शिक्षकांनी महाविद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती मुजावर बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी महिलांच्या प्राचीन काळापासून ते सांप्रत काळापर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पुरुषांपेक्षा महिलांकडे सहनशीलता अधिक असल्याने त्या रुद् रोगाला सहजासहजी बळी पडत नसल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी मोनाली निकम – पाटील,शिवानी पाटील , प्रमोद काळे, पुनम चव्हाण आदी विद्यार्थी – शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. सौरभ झेंडे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पोवार – करंजवडेकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे संयोजन अनिरुद्ध कांबळे , सौरभ झेंडे, साई नलगे, पृथ्वीराज केकरे या विद्यार्थी – शिक्षकांनी केले. प्रा. अजित लोकरे आणि प्रा. एस. जी. जाधव व्यासपीठावर होते.