सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जयोत्सव 2K25 अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जयोत्सव 2K25 अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 06/03/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जयोत्सव २k२५ अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ.संजय गळीतकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी दिली. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य,कार्यालयीन अधीक्षक, समन्वयक,सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदरच्या मैदानी स्पर्धा ०३ मार्च २०२५ ते दि. ०५ मार्च २०२५ या कालावधीमध्ये व्यवस्थितरित्या पार पडल्या. स्पर्धेमध्ये ९ क्रीडा प्रकारांमध्ये एकूण ४५७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी असे अनेक उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले. क्रीडा समन्वयक म्हणून प्रा.शिवशरण व्हि.एच. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले.