ताज्या घडामोडी

भारतीय संविधानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव – डी. के. साखरे

भारतीय संविधानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव – डी. के. साखरे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
डोंगरगाव/ प्रतिनिधी दिनांक 21/02/2025 : भारताचे संविधान लिहताना मला जास्त त्रास झाला नाही कारण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवूनच मी संविधान लिहले आहे, असे संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे भारतीय संविधानावर स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे, असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात साखरे बोलत होते.यावेळी विचारपीठावर डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे, संगम विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे, डोंगरगाव शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी, मोरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कांबळे, ग्रामसेवक सुशांत कसबे, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अमोल लटके,मराठा आंदोलनाचे मदन पाटील, तानाजी मिसाळ, दत्तात्रय भुसे, माजी सरपंच धनंजय माळी, यशवंत आकळे,गणिम पठाण, बाबा सय्यद, शिवाजी जाधव, निसार पठाण ज्योतीराम सावत, आण्णासाहेब पाटील, दत्तात्रय खडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना साखरे म्हणाले की, राजांची जयंती केवळ करमणूक म्हणून साजरी न करता त्यांचे विचार आचारणात ही काळाची गरज आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे, अमृता कुलकर्णी, माजी सरपंच धनंजय माळी, बाजीराव गवळी (गुरुजी)आदींनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला तर डोंगरगाव व मोरेवाडी शाळेतील विरा तोडकर व आरोही भुसे या विद्यार्थ्यांनी शिव जयंतीनिमित्त विविध कला गुणदर्शनाचे सादरीकरण केले.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, माजी सरपंच सचिन आकळे, डॉ. नादकिशोर शिंदे, विक्रम साखरे, पंकज मस्के, संगम खडतरे, बाबा खडतरे, नामदेव लटके, बिभिषण लोहार,जोतीराम क्षीरसागर, विजय बाबर,श्रेयस पाटील, शंकर पाटील, सौरभ बाबर, ग्रामपंचायत कर्मचारी पंडित साखरे व सखू साखरे यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दत्तात्रय भुसे यांनी केले तर आभार मराठा आंदोलक मदन पाटील यांनी मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button