ताज्या घडामोडी
श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज येथे श्री शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज येथे श्री शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11 जानेवारी 2025 : श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर ) येथे श्री शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सोमवार दिनांक 13/01/2025 रोजी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी महाआरती होईल. श्री देवीला भाजी भाकरीचा महानैवैद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल तरी सर्व भाविकांनी महिला भाविकांनी भाजी भाकरीचा नैवेद्य आणून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विनंती आवाहन श्री अकलाई देवी देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी केले आहे.