ताज्या घडामोडी

ओबीसी /मराठा आरक्षण लढाईत नवबौध्द समाजाची भूमिका काय?

ओबीसी /मराठा आरक्षण लढाईत नवबौध्द समाजाची भूमिका काय?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 28/11/2023 :
गेल्या दोन महिन्यांपासून मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून निजाम कालीन कुणबी नोंदीचे आधारे ओबीसी आरक्षणाच्या 27% कोट्यात मराठा समाजाचा अंतर्भाव राज्यपाल यांच्या एक अध्यादेश काढून करावा , आणि तो आमचा नैसर्गिक हक्क आहे असे विधान करून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण युद्ध छेडले
या युद्धानंतर ओबीसी वर्गात प्रचंड अस्वस्थता होती , परंतु या अस्वस्थेला तोंड कोणीच फोडत नव्हते
ओबीसी /एस सी अश्या सर्व वर्गाचा या आरक्षणास पाठिंबा आहे , गरिबाच्या लेकराचे भवितव्य उध्वस्त करू नका , असे आवाहन करून कोणाचाच विरोध नसताना शासन आरक्षण का देत नाही ? असा प्रश्न निर्माण करीत “एक तर ओबीसी आरक्षण मिळवून माझी विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल” अश्या निर्वाणीचा सुर आळवत दीर्घकालीन उपोषण चालू ठेवल्याने त्यांचे जीविताचे कांहीं बरे वाईट झाल्यास लोक क्षोभ उसळेल या भीतीने शासनाने हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेऊन उपचार जबरदस्तीने करण्याचा निर्णय घेतला , आणि यातून पोलिसावर दगडफेक , व लाठीमार या घटना घडून आल्या ,
शांततेत चाललेले हे आंदोलन अचानक हिंसक झाले आणि आणि माजी लोकप्रतिनिधी यांचे बंगले , आणि समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष यांच्या हॉटेल ला आगी लावण्यात आल्या ,
येथूनच ओबीसी चे नेते छगनराव भुजबळ , धनगर समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे , आ गोपीचंद पडळकर , विरोधी पक्ष नेते ना विजय वडेट्टीवार , आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील , मुस्लिम ओबीसी प्रमुख शब्बीर भाई अन्सारी , “उचल्या “कार लक्ष्मण गायकवाड , अशी अनेक मंडळी पुढे सरसावली आणि अंबड येथे प्रति सभेचे नियोजन करण्यात आले , लागोपाठ हिंगोली येथे ओबीसी मेळावा पार पडला
विदर्भ खानदेश विभागातील कुणबी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी ही सरसकट मराठा समावेश करण्यास हरकत घेतली
पण या सर्व बाबी घडतं असताना वंचित चे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांनी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिले ,
तर रामदास जी आठवले साहेब यांनी ही मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला परंतु ओबीसी कोट्या ला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका घेतली
कायद्याचे अभ्यासक असलेल्या ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांना या आरक्षण मागणीतील कायदेशीर अडचणी ज्ञात आहेत ,
निजामी मराठा पासून गरजवंत मराठा विभागला गेला नाही तर या लढाईस यश प्राप्त होणार नाही असे सुचवत ते क्रांतिकारी बदल घडवून आणू पाहत आहेत , परंतु असे विभाजन त्यांचे त घडून येईल का ? हा संशोधनाचा भाग ठरेल ,
11महिन्या पूर्वी राजू परुळेकर यांनी प्राध्यापक हरी नरके यांची दीर्घकालीन मुलाखत घेतली होती , जे आज आपल्या स्मृतीत शिल्ीक आहेत. ज्यात शिवकालीन समाजव्यवस्था , महात्मा फुले , छत्रपती शाहू राजे , ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळ असा पूर्ण वैचारिक आढावा होता , आणि
कोणतेही सामाजिक स्टेटस न गमावता फक्त सर्टिफिकेट चे आधारे स्वतः ला मागासवर्गीय घोषित करून आरक्षणाचे फायदे घेण्याची रणनीती उच्च वर्णीयांनी आखलेली आहे , हे त्यांनी सांगितले.
भारतीय व्यवस्थेत जातीय वर्ण श्रेष्ठत्वाचा दुराभिमान किती खोलवर रुजला आहे हे त्यांनी “मुरली चरित्र” या कथानकं द्वारे स्पष्ट केले
चर्मकार असलेल्या एक पाठीय मुलाने ब्राम्हणाच्या वाड्यात हलकी सलकी कामे करताना सर्व वेद मंत्र पाठ केले ,
आणि तो दुसऱ्या गावी गेला , तेथे त्याचे ज्ञान पाहून एका ब्राम्हण पंडिताने स्वतः ची कन्या त्यास दिली व तो ब्राम्हण म्हणून राहू लागला परंतु अनेक वर्षाच्या संसारा नंतर त्याचे मूळ घर पहावे अशी इच्छा त्याचे पत्नित निर्माण झाली आणि या हट्टापुढे तो हतबल झाला
मूळ गावी गेलो तर बींग फुटेल म्हणून वाटेत जाताना त्याने पत्नीला विहिरीत ढकलून दिले व एकटाच सासरी पोहचला व पत्नी मृत झाल्याचे सांगितले
परंतु त्याची पत्नी एक महिन्या नंतर घरी आली , आणि मी पाणी पिताना विहिरीत पडले मी मृत झाली असे समजून हे इकडे आले , कांहीं साधू लोकांनी मला वर काढले , असे सांगून तिने पतीचे प्राण वाचवले
आपली पत्नी इतकी समजूत दार आहे , समर्पित आहे व आपण तिच्याशी असे वर्तन केले याचा
पच्छाताप त्यास झाला , आणि त्याने असे का केले? याचे कारण सांगितले व तो चर्मकार असल्याचे सांगितले .
” तू मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलास या बद्दल मी तुला क्षमा करते , परंतु तू चर्मकार आहेस हे मी सहन करू शकत नाही असे म्हणून रॉकेल ओतून त्याला ती जिंवत जाळते ”
ही पराकोटीची जात मानसिकता या देशात रुजलेली आहे , ज्याचा प्रत्यय , आरक्षण घेणारे भिकारी , फुकटे , तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही , तुमची लायकी नाही अश्या एक ना अनेक कमेंट समाज माध्यमावर व्यक्त केल्या जात असल्याचे आपण सारेच जण पाहतो
राजू परुळेकर यांनी सांगितले की मुळात आर्थिक मागास आरक्षण केंद्राने देय करणे याचा अर्थ आरक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे ,
आणि आरक्षण मागणी वेगवेगळ्या समुदाया कडून करवून घेणे हा प्रयत्न ही त्या अर्थाने आरक्षण विरोधी मानसिकता निर्माण करणेच आहे.
एका बाजूने ओबीसी नेत्यांनी मोठे आव्हान उभे केले असताना ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांनी ओबीसी समाजाच्या लोकांनी माझ्या नादाला लागू नये , असा निर्वाणीचा इशारा त्यांना दिला , आम्ही जेंव्हा मंडल आयोगाची लढाई लढत होतो तेंव्हा तुम्ही “कमंडल”चे बाजूने लढाई लढत होता ,
याचीच री ओढत मनोज जरांगेपाटील यांनी ही ना छगनराव भुजबळ यांनी ही हुतात्मा स्मारक गो मुत्रा ने धतले होते याची आठवण करून दिली
ही घटना रिडल्स आंदोलनाच्या दरम्यान झालेली होती ,
मूळ प्रश्न इथे हा निर्माण होतो की वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेच्या मानसिक उतरंडीला , व एक जात दुसऱ्या जातीचा तिरस्कार करण्याची मानसिकता हा जात व्यवस्थेचा अंगभूत गुणधर्म असल्याने हा व्यक्ती दोष नसून तो सार्वत्रिक दोष आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर ही हे मानत होते की व्यक्ती परिवर्तन शील असते , या अर्थाने ना भुजबळ साहेब यांनी ओबीसी हक्का प्रति जागरूक राहिले आणि म्हणूनच त्यांनी शिवसेना सारख्या तत्कालीन बलाढ्य अशा पक्षाशी ही बंड करून त्यांचे लढवय्ये पण सिद्ध केले
प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत भ्रष्टाचार हा शिष्टाचार असल्याने याचा दोष फक्त भुजबळ साहेब यांच्या माथी मारणे योग्य ठरणारे नाही
ही लढाई व्यक्ती सापेक्ष नाही तर व्यवस्थेच्या विरोधातील आहे
शिवाजी पार्क येथील झालेल्या वंचित चे संविधान सन्मान सोहळ्यात बोलताना ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांनीम्हैसूर स्टेट विरुद्ध श्रीमती चंपकम दोराय राजन केस चां उल्लेख करून या केस मध्ये मराठा आरक्षण अडकल्याचे सांगितले ही केस फार इंटरेस्टिंग आहे , ज्या केस चे निकालाचा परिणाम पहिली घटना दुरुस्ती करण्यास कारणीभूत ठरली
ब्रिटिश कालखंडात म्हैसूर स्टेट ने 1927साली मद्रास प्रेसिडेन्सी सांप्रदायिक सरकारी आदेश काढून मेडिकल व इंजिनियरिंग सरकारी कॉलेज मधे 14जागा आरक्षित केल्या होत्या गैर ब्राम्हण वर्गा साठी 6जागा , मागास जाती साठी 2जागा ,ब्राम्हण जाती साठी 2जागा , हरीजन साठी 2जागा , अंग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन साठी 1जागा आणि मुस्लिम साठी 1जागा अश्या जागा राखीव ठेवल्या होत्या
श्रीमती चंपकम दोरायराजन यांना मेडिकल साठी प्रवेश मिळाला नाही
माझी कुवत असताना ही माझ्या मूलभूत हक्कावर गदा आल्याने त्यांनी अनुच्छेद 226नुसार मद्रास उच्च न्यायालयात 1950साली याचिका दाखल केली
या केस चां निकाल त्यांच्या बाजूने लागला , पुढे मद्रास स्टेट ने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले
मद्रास स्टेट ने त्यांची बाजू मांडताना , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती , आणि समाजातील कमजोर वर्गाच्या शैक्षणिक प्रगती साठी राज्याने जी निती ठरवली आहे ती निती घटनेच्या अनुच्छेद 46द्वारे स्थापित केलेला आहे
संविधानातील अनुच्छेद 46राज्य सरकारला समाजातील कमजोर विशेषतः अनु जाती/जमाती यांचे हिताची वृध्दी करणे व सर्व प्रकारच्या सामाजिक अन्याय व शोषणा पासून त्यांचा बचाव करण्याचा आदेश देते
भारतीय संविधान अनुच्छेद 13राज्यावर मौलिक अधिकार , त्याचा सन्मान आणि ते लागू करण्याचे कर्तव्य स्थापित करते
अनुच्छेद 4राज्याचा निती निर्देशक सिद्धांत सांगते , जो कोणत्याही न्यायालया द्वारे स्थापित होत नाही परंतु अनुच्छेद 37द्वारे कायदे बनवताना या सिद्धांताना लागू करणे अनिवार्य ठरते
हेच मद्रास उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टाने नाकारल्याने व दोरायराजन यांच्या बाजूने निकाल कायम केल्याने संशोधन गरजेचे झाले
अनुच्छेद 15,19,85,87,174,176,341,
342,372,आणि 376मध्ये संशोधन करून कायद्याच्या रक्षणासाठी संपत्ती अधिग्रहण , भूमी सुधार अश्या अनेक कायद्यांना न्यायिक समिक्षे पासून सुटका करण्यासाठी 9वे परिशिष्ट , 31A, व 31Bजोडले गेले
सार्वजनिक हित , सार्वजनिक सुरक्षा , प्रेस चे कायदे , आणि अपराधिक प्रावधान यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सांविधनिक अधिकाराच्या विसंगत मानून रद्द बादल ठरवले जात होते त्यास प्रतिबंध झाला
या केस चां रेफरन्स देऊन त्यांनी एक प्रकारे हेच सुचवले आहे की असे आरक्षणाचे अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढले तरी ही ते रद्दबादल च ठरतील , पण ही बाब आंदोलन कर्त्या ना समजली नाही ,
या मुळे ते आरक्षण मिळवणारच या भ्रमात राहत आहेत ,
पण या सामाजिक व राजकीय प्रेरणेतून चालू झालेल्या आंदोलनाचे पडसाद सार्वजनिक जीवनात उमटत असून आज ओबीसी /एस सी/एस टी / व्हीजे /एन टी अश्या सर्व प्रवर्गाची एकजूट प्रस्थापित दबंग तेच्या विरोधात एकवटत असताना यात नवबौध्द समाजाचे नसणे त्यांच्या भविष्यातील सामाजिक , राजकीय लढाईला एकाकी पाडू शकते , हे मात्र खरे आहे ,
शोषित वंचित घटकांच्या बाजूने जायचे की , शोषण कर्त्या चे बाजूने याचा निर्णय नवबौध्द समाजाने घ्यायचा आहे.

ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button