ताज्या घडामोडी

तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या.

तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या.

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली येथून
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 11/02/2025 : 
जेव्हा सगळं घर रडत असतं, तेव्हा तुम्ही सावरता.
जेव्हा घरभर पसारा होतो,
तेव्हा तुम्ही एकट्याचं आवरता.
राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं, केस विंचरणं, लिपस्टिक लावणं, आणि पावडर लावून नटणं.
तुमचं हसणं महत्त्वाचं आहे,
ते असचं फुलू द्या.
तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या.
डोळ्याखाली काळे डाग,
चेहऱ्यावरती रिंकल्स, पांढरे झालेले केस आणि, गाला वरती पिंपल्स,
असू द्या हो,
एक धाडसी आई आहात तुम्ही,
साऱ्या जगाशी लढता,
एकावेळी एक नाही, दहा दहा कामे करता,
या घाईत तुमचा मोर्चा,
स्वतःकडेही वळू द्या.
तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या.
स्ट्रेस आहे कामाचा,
हवं आहे प्रमोशन,
किराणा संपत आलाय, त्याचं वेगळच टेन्शन,
वाढदिवस, एनिवर्सरी सारं लक्षात ठेवता,
अगदिचं कॉल नाही पण आवर्जून मेसेज करता,
तुमच्या कौतुकानं कूणी जळलं तर जळू द्या,
पण तुम्हीं सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या.
वेळेत खा,
वेळेत झोपा,
जरा जपा स्वतःला,
तुमच्यामुळेचं आहे घरपण तुमच्या घराला,
नको सतत साऱ्यांची मनं जपणं,
खुप छान असतं कधीतरी “आपण आपलं असणं.”
असा थोडासा “me time” तुम्हालाही मिळू द्या,
तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या.

✒️ प्रविण सरवदे, कराड,

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button