अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील क्रमांक जाहीर 🟡 पुढील वर्षी लावणी स्पर्धा नियोजित दि. 17 व 18 जानेवारी 2026 होणार
अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील क्रमांक जाहीर
🟡 पुढील वर्षी लावणी स्पर्धा नियोजित दि. 17 व 18 जानेवारी 2026 होणार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/02/2025 : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील पारितोषिक क्रमांक जाहीर झाले आहेत.
लावणी स्पर्धेचे विजेते-
प्रथम क्रमांक विभागून – न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र यवत,चौफुला,
अर्चना वालवडकर, पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र,वेल्हे, सातारा, कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र, चोराखळी, धाराशिव
द्वितीय विभागून – शीतल पूजा बुमकर जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी, अनिता परभणीकर, नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडनिंब
तृतीय– प्रीती परळीकर, न्यू अंबिका लोकनाट्य कला यवत, चौफुला
चतुर्थ– सुनीता, शामल, स्नेहा लखनगावकर नटरंग कला केंद्र, मोडनिंब
उत्कृष्ट अदा वैयक्तिक -५ हजार
प्रीती परळीकर, न्यू अंबिका यवत चौफुला
उत्कृष्ट मुजरा – ३ हजार
प्रीती परळीकर
उत्कृष्ट गायिका- कल्याणी गायकवाड, पिंजरा कला केंद्र, वेल्हे सातारा
उत्कृष्ट ढोलकी वादक – अर्जुन शिंदे
नटरंग कला केंद्र, मोडनिंब
उत्कृष्ट हार्मोनियम वादक- विकी जावळे,
नटरंग कला केंद्र, मोडनिंब
उत्कृष्ट तबला वादक – निलेश डावाले,
नटरंग कला केंद्र, मोडनिंब.
परीक्षक
मधुकरराव गायकवाड, माजी कुलगुरू,
डॉ. शशिकांत चौधरी, समीक्षा लेखक,
डॉ. चंद्रकांत जोशी, लेखक, कवी, चित्रपट लेखक
बक्षीस वितरण सोहळा आमदार दिलीपराव सोपल यांच्या हस्ते आणि लावणी स्पर्धेचे संकल्पक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री संपन्न झाला.