ताज्या घडामोडी

रथसप्तमी

रथसप्तमी

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन  : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/02/2025 : रथ सप्तमी या दिवशी श्री आदित्य नारायणा ची पुजा करतात श्रीसुर्य देवाला, श्रीनारायण स्वरूप म्हणजे श्रीविष्णु स्वरूप असे जाणले जाते.
जो नित्य श्री सुर्य देवाची पुजा करतो व रोज अर्घ देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्ऱ्य नष्ट होते आणि तो सुखी होतो.
‘सूर्यग्रहणतुल्या तु शुक्ला माघस्य सप्तमी ।
अरुणोदयवेलायां तस्यां स्नानं महाफलं’ ।।
माघ मासातील शुक्ल सप्तमी ही सूर्यग्रहणासमान पुण्यदायक सांगितली आहे. या दिवशी अरुणोदयी (सूर्योदयापूर्वी दीड तास) तिलयुक्त पाण्याने पुढील मंत्र म्हणून स्नान करावे
‘यदा जन्मकृतंपापं मया जन्मसुजन्मसु ।
तन्मे रोगं च शोकं च माकरु हंतु सप्तमी ।’
या दिवशी सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाच्या प्रतिमेचे पूजन करून गायीच्या गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या मडक्यात दूध घेऊन दुपारच्या उन्हात ते दूध उतू जाऊ देण्याचा प्रघात आहे. उरलेले दूध प्राशन करावे. या दिवशी सूर्यनारायाणाच्या प्रतिमेस सात धान्ये, सात रुईची पाने व सात बोरे वाहावीत.
श्रीसुर्य देवता परिवार
सुर्य पिता:-श्री कश्यप ऋषि
सुर्य माता:- अदिती देवी
श्रीसुर्य देवाला चार धर्मपत्नी होत्या
१) सुर्यदेव- सविता देवी
(याचा पासुन पुत्र व कन्या)
पुत्र:- वैवस्वत मनु व यम देव
कन्या:- यमुना (नदी)
२)सुर्यदेव- राज्ञी देवी
पुत्र- रैवत
३)सुर्यदेव – प्रभा देवी
पुत्र- प्रभात
४)सुर्यदेव- छाया देवी (सविता देवीच्या छाया पासून छाया देवी).
सप्तमीपुत्र:- शनि देव व सावर्णि
कन्या:- भद्रा(विष्टी) व तपती
असा परिवार आहे मत्स्य पुराण नुसार माहिती आहे
रथसप्तमी महत्व
माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्याच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ, स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाजजीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे.
महासप्तमीला स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले आहे. तसेच सूर्य सप्तमी, भानू सप्तमी या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते. त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेला आहे .
सूर्याची ऋषींप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते.
सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो.
सूर्य स्वत:च्या जवळील तेज, ऊर्जा आणि चैतन्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते.
ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज, ऊर्जा आणि चैतन्य देत असतो.
`रथसप्तमी’ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते.
रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.
रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे.
आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।
म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे.
वर्षभर सूर्याचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता – महासप्तमी,
मस्तकावर बोरीची व रूईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता – माघसप्तमी,
मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता – अचलासप्तमी
इ.प्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान, असे काहींचे मत आहे. सर्व रोगांतून व पाषांतून मुक्तता आणि सौभाग्य, पूत्र, धन, इ.ची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते.
अंगणातच शिजवलेली दुधाची खीर:-
महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्य़ा सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ऊतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. हळदीकुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अन्याध्याय असतो. रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम असतात.
सप्तधान्ये, रूईच्या पानांचा नेवैद्य:-
आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रक्तचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय, सदा सवितुमण्डल मध्यवर्ती, या मंत्राने ध्यान करून पूजा करतात. गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्ये, सात रूईची पाने व सात बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अघ्र्य देतात, ब्राह्मणाला भोजन घालतात.
रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे.
आरोग्यं भास्करात् इच्छेत् । म्हणजे सूर्याकडून
आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना करावी !

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button