अनाथ जनतेचे पालक धन्य हो

अनाथ जनतेचे पालक धन्य हो
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28/01/2025 : गेले 15-20 दिवस आपण अनाथ आहोत आपल्याला पालक नसल्यास आपले हाल हाल होतील किंवा आपले हाल कुत्रे खाणार नाही असे महाराष्ट्रातल्या जनतेला वाटू लागले आहे
याचे कारण म्हणजे पहिल्यांदा मंत्रिमंडळातील खातेवाटप व त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री यावर सुरू असणारा गर्दारोळ हे ते कारण आहे
इतके दिवस पालकमंत्री हे पद त्या त्या जिल्ह्याच्या झेंडावंदन अगर अन्य कार्यक्रमाला हजर राहणारी मंत्री एवढेच वाटत होते
पालकमंत्री बदली किंवा पालकमंत्री याबद्दल प्रथम अजित दादा युतीमध्ये आले व त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले व चंद्रकांत दादांना हटवले यामुळे मनात पालकमंत्र्यांच्या हक्काबद्दल किंवा सत्तेबद्दल शंकेची पाल चुकचुकली
या विधानसभेच्या निवडणुका नंतर पालकमंत्री पदासाठी चाललेली रस्सीखेच पाहिली की असे वाटू लागते आणि हे पालकमंत्री पद इतके इतकी माया गोळा करणारे आहे का?
*नवे सरंजामदार व त्यांची कुरणे
मग जरा काही तज्ञ व्यक्तींशी चर्चा केल्यावर समजले पालकमंत्री यास जिल्ह्यातील पूर्ण अधिकार असतात तो जिल्ह्याचा पालकमंत्री असून तो जिल्ह्यापुरता मुख्यमंत्रीच असतो पोलीस महसूल प्रशासन यावर त्याची विलक्षण पकड असते
जिल्ह्यातील लहान मोठ्या सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक बदली बढती ही सर्व पालकमंत्र्याचीच हक्काची गोष्ट
जिल्हा नियोजन मंडळ व त्याचे अफाट बजेट यातून मिळणारे कमिशन हे पालक मंत्र्याच्या खात्यावर पडत असते
सरकारी खात्यातील बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या हव्या त्या ठिकाणी बदल्या करणे अगर न करणे यासाठी गोरगरीब जनतेला छळून लाचलूचपत खाऊन सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांनी जी माया गोळा केलेली आहे ती पालकमंत्र्यासमोर रिकामी करावी लागते यासाठी पालकमंत्री पद हवे असते
कोणत्या चाणाक्ष व धूर्त राजकारण्याच्या डोक्यातून ही पालकमंत्री हे पद निर्माण झाले आहे हे समजून येत नाही
किती दिवस अनेक वर्षे अनेक मंत्री मंडळे आली व गेली पण पालकमंत्री या पदास इतके महत्त्व आहे हे या सरकारमध्ये कळाले हे मलईदार पद नक्कीच आहे
नाहीतर रस्त्यावर टायरी जळणे रस्ता रोको करणे किंवा नरहरी झिरवळनी गरीब माणसास गरीब जिल्हा दिला असे म्हणणे यातच या पदाचा मलाईदारपणा दिसत आहे
ही जनता आता अनाथ झाली आहे हे राजकारणी गल्ले भरू धन दांडगे पुढारी पालक झाले आहेत
या लालची गल्लाभरू स्वार्थी घनदाडंग्या नेत्याच्या मुळे आता खेदाने महावी लागत आहे
अकेला देवेंद्र क्या करेगा
ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी
पुढील लेख
दावोसहून उद्योग आणाल पण खंडणीबहाद्दरांना कसे आवरणार?