तालुका स्तरीय समिती मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान शपथ, स्वाक्षरी व जनजागृती रॅली

तालुका स्तरीय समिती मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान शपथ, स्वाक्षरी व जनजागृती रॅली
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
सुजाता गोखले
माळशिरस दिनांक 26/01/2025 : “बेटी बचाओ बेटी पढाओ” या योजनेच्या दशकपूर्ती निमित्त दिनांक 22 जानेवारी 2025 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज उपविभागीय कार्यालय अकलूज येथे बेटी बचाओ बेटी पढाओ माळशिरस तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी विजया पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांच्यासह सर्व तालुकास्तरीय समिती सदस्य व प्रांत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका यांनी बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेची शपथ व स्वाक्षरी मोहीम घेतली.
यानंतर प्रांत कार्यालयापासून नवीन स्टॅन्ड मार्गे सदुभाऊ चौक ते प्रतापसिंह चौक मार्गे प्रांत कार्यालय या मार्गावर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या जनजागृती पर घोषणा देत सुमारे 63 बाईक सह 112 अंगणवाडी सेविका तसेच विभागातील समिती सचिव, बाल विकास प्रकल्पाधिकारी आस्मा आतार स्वतः व अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच समितीमधील अधिकारी कर्मचारी महिला यांनी बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन जनजागृती केली. स्त्रीभ्रूणहत्या थांबवावी तसेच लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी विविध प्रयत्नांच्या उपक्रमांची अंमलबजावणी चोखपणे करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन माळशिरस बालविकास प्रकल्प अधिकारी आस्मा आतार व अकलूज बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लाडवाड, नागरी प्रकल्प पश्चिम सोलापूर चे बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांनी नियोजन केले.