गल्ल्यावर बसून पैसे मोजणारा माणूस जेव्हा भारत देशाच्या भविष्याचा विचार करतो तेव्हा निर्माण होते ती म्हणजे रत्नत्रय शिक्षण संस्था – डॉ. विकास शहा

- गल्ल्यावर बसून पैसे मोजणारा माणूस जेव्हा भारत देशाच्या भविष्याचा विचार करतो तेव्हा निर्माण होते ती म्हणजे रत्नत्रय शिक्षण संस्था – डॉ. विकास शहा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/01/2025 :
रत्नत्रय इंग्लिश मेडियम निर्माण करण्यात अत्यंत बहुचर्चित, ऐतिहासिक व सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे अनंतलाल दादा यांनी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण केले म्हणून त्यांना 75 हजार कोटी शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन करत डॉक्टर विकास शहा यांनी व्यवस्थापनाचे काम अतिशय उत्कृष्ट आहे अशी वाहवा केली. पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचं काम पाहून खूप भारावलो. तसेच हाती माती दिली तर त्या मातीचे मडके बनवून त्याच्यामध्ये रोपटे लावून त्या रोपट्याचा वटवृक्ष बनवणारी माणसे रत्नत्रय संस्थेने जवळ बाळगलेली आहेत आणि म्हणून या संस्थेला आणि दादांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. या संस्थेमध्ये एक हृदयस्पर्शी ओलावा आहे आणि तो फार आनंददायी वाटला. या हृदयाचे त्या हृदयी, या देहाचे त्या देही, या विचारांची त्या विचारे हे सूत्र या रत्नत्रय परिवाराने जोपासले आहे, अमृताचे डोही अमृत तरंग आणि हे अमृत अनंत आहे आणि त्यांना हा समुद्र जोपासता आला आहे. रत्नत्रय म्हणजे जीवनाचा पाया आहे, ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य जपणे म्हणजे रत्नत्रय होय. विद्यार्थी मित्रहो आपण या चांगल्या विचारांच्या प्रवाहात आहात. देशात, परदेशात कुठेही जा पण या रत्नत्रयला विसरू नका असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. जगत्जेता सिकंदराचे उदाहरण देत कोण, कुठला ,कुठून आला हा अनंत पण यांनी विद्यार्थ्यांसाठी जे काम केलं आहे, करतो आहे, आणि करेल म्हणून म्हणून तो अनंत सिकंदर आहे. असे बोलताना बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियेले जनसेवे जीवन दिधले या उक्तीप्रमाणे भारत मातेसाठी सैनिक सीमेवर लढतो, बळीराजा आपल्या शेतामध्ये अहोरात्र कष्टतो आणि दोघेही आपल्या थोडक्या उत्पन्नावर देशाचे भवितव्य घडवण्यासाठी झटत असतात आणि हे भवितव्य म्हणजे आजची मुलं, विद्यार्थी हे विद्यार्थी भारत देशाचा मूळ पाया आणि उद्याचे भविष्य घडवणारा नागरिक आहेत, देशाचा आधारस्तंभ आणि पाया जर मजबूत असेल तर निश्चितपणाने इमारतही मजबूत होते. यामध्ये संदेह नाही, शंका नाही तर दृढ विश्वास आहे आणि याच विश्वासावर आपण ही रत्नत्रय शाळा सुरू केलेली आहे आणि भविष्यात या रत्नत्रय प्रशालेचा विद्यार्थी या देशाचे नेतृत्व करेल यात शंका नाही. अनंतलाल दोशी यांच्या सारखा एक व्यापारी माणूस आपले सर्वस्व ओतून जर शिक्षण संस्था उभी करत असेल तर मनात विचार येतो हा जर स्वतःच्या विश्वात रमला असता तर अनेक सुख सोयी मिळवले असते पण असं न करता समाजातील आपण काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांच्या कल्याणासाठी काहीतरी करावे त्यासाठी आपणही वाटा उचलला पाहिजे अशी वृत्ती प्रवृत्ती संस्कृती मनात ठेवून जेव्हा शाळा निर्माण करतो तेव्हा अशा माळरानावर नंदनवन फुलते आणि ते नंदनवन म्हणजे रत्नत्रय आणि या नंदनवनामध्ये अनंत फुले फुललेली पाहणं ही दूरदृष्टी ठेवून आपल्या परिवाराला सोबत घेऊन काम करणं यावरून रत्नत्रय परिवार किती दूरदृष्टी घेऊन चालत आहे हे दृष्टीपथात येते असे मनोगत व मार्गदर्शन रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल मांडवे येथे अनंत अमृत महोत्सव , 2025 व वार्षिक बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना माननीय डॉ. विकास शहा यांनी व्यक्त केले. यावेळी लेझीम ने केलेले स्वागत इतके आणि इथे वातावरण पाहून मन भारावून गेलो संस्था आणि संस्थेतला प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारी पार पाडताना पाहून या संस्थेचे भविष्य आणि प्रगती उज्वल आहे यात शंका नाही संस्थेची प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जाईल अशी खात्री वाटते असे उद्गार राजेश शहा यांनी कार्यक्रमा च्या निमित्ताने बोलताना उद्गोदीत केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे वार्षिक स्नेहसंमेलन मदत करतो आणि बक्षीस वितरणातून त्यांनी केलेल्या कार्यासाठी कौतुकाची थाप मिळते यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्याच्या जडणघडणीमध्ये विद्यार्थ्यांना फायदा होतो आपल्या भारत देशाने संस्कृतीचा जो वारसा जपला आहे त्याचे दर्शन या कार्यक्रमांमधून होत असते आणि जेव्हा असे कार्यक्रम आपण पाहतो तेव्हा नक्कीच प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या शालेय जीवनाची आठवण करून देणारे व्यासपीठ म्हणजे रत्नत्रय नितीन गांधी यांनी कार्यक्रमांमध्ये बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
ज्या ज्या वेळी संस्थेत येतो त्या त्यावेळी संस्थेची प्रगती जाणवते आणि या संस्थेसाठी काहीतरी करावं वाटतं आणि संस्थेचा कोषाध्यक्ष म्हणून मी मिहीर गांधी या संस्थेसाठी सर्व समाज माध्यमात आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन मिहिर गांधी यांनी बोलताना केले
2 शिक्षक 16 विद्यार्थी एवढ्या संख्येवर भाड्याच्या खोलीमध्ये 2008 रोजी सुरू झालेली संस्था म्हणजे रत्नत्रय. शाळेची भव्य आणि सर्व सोयीने युक्त इमारत असावी या विचाराने सर्व संचालक मंडळाच्या ठरावाने स्वतःची साडेचार एकर जमीन संस्थेत दान देऊन 2015 साली संस्थेच्या नवीन बांधकामाचा शुभारंभ करून इमारतीत सुरुवात केली व आज या संस्थेमध्ये 700 विद्यार्थी 55 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, भव्य दिव्य खेळाचे मैदान ,32 खोल्या असणारी इमारत, प्री प्रायमरी स्कूल ,माळशिरस , प्री प्रायमरी स्कूल,नातेपुते, आय टी आय कॉलेज ,दहिगाव, प्री प्रायमरी व रत्नत्रय अकॅडमी,दहिगाव या ठिकाणी नवीन शाखा सुरू करून भविष्यामध्ये बी. कॉम, बी. एससी एम. कॉम, एम. एस. सी सुरू करून विद्यार्थ्यांना या विद्येच्या माहेर घरामध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक दालने व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देईन असा शब्द या कार्यक्रमांमध्ये बोलताना प्रमोद दोशी यांनी दिला
या अनंत अमृत महोत्सव 2025 व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगावचे, अध्यक्ष राजेश दोशी, मुंबई, शांतिकाका सराफ फलटणचे संचालक नितीन गांधी, नातेपुतेचे प्रतिष्ठित व्यापारी सुभाष दोशी, मराठी चित्रपट महामंडळ, विभागीय सदस्य डॉ. विकास शहा, रत्नत्रय परिवारचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र महाराष्ट्र अंचलचे अध्यक्ष मिहीर गांधी, अकलूज येथील स्त्री रोग तज्ञ डॉ .सतीश दोशी, डॉ. सुरुची शहा, इशिता शहा,सदाशिवनगर चे प्रथम नागरिक व संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार दोशी, संस्थेचे सचिव प्रमोद दोशी, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल गांधी, अकॅडमी दहिगावचे चेअरमन रोनक चंकेश्वरा व अमित गांधी, माळशिरस स्कूलचे चेअरमन अभिजीत दोभाडा, नातेपुते स्कूलचे चेअरमन वैभव शहा , स्वदेश दोशी, निवास गांधी, राहुल पिसे ,रामभाऊ कर्णे, बबन गोफने, सुरेश धाइंजे, मृणालिनी दोशी ,भाग्यश्री दोशी, विनयश्री दोशी, पुनम दोशी, धनश्री दोशी ,सुरज दोशी, अजय गांधी, विठ्ठल अर्जुन , ज्ञानेश राऊत, सारिका राऊत, दहीगाव आयटीआय चे प्राचार्य गजेश जगताप, रत्नत्रय अकॅडमी दहीगाव चे मुख्याध्यापक सतीश हांगे व सर्व संचालक मंडळ, सर्व मान्यवर, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, सर्व शाखा मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ विद्यार्थी हे बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये महावीर गीत, कोळीगीत, देशभक्तीपर गीत पोवाडा , साउथ इंडियन, कॉमेडी, रिमिक्स, शेतकरी गीत, प्रेम गीत, जुनी नवीन मराठी गीते, फनी सॉंग, लावणी, भक्तीगीत, भावगीत खंडोबा गीत असे एकूण 29 गीतांवर सुंदर व मनमोहक नृत्य सादर करण्यात आले, संस्थेकडून सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली, तसेच सर्वांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सविता देसाई, सूत्रसंचालन अमृता मोहिते व आभार वीरकुमार दोशी यांनी केले.