शारदीय नवरात्र महोत्सवात कै. वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे स्मृतिप्रित्यर्थ मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

शारदीय नवरात्र महोत्सवात कै. वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे स्मृतिप्रित्यर्थ मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
तांबवे /प्रतिनिधी दिनांक 11.9.2024 :
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तांबवे (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील ग्रामदैवत वज्राई देवी नवरात्र महोत्सव मंडळ, भवानीमाता नवरात्र महोत्सव मंडळ, जय दुर्गादेवी नवरात्र महोत्सव मंडळ व श्री गोरक्षनाथ सामाजिक प्रतिष्ठान तांबवे यांचे संयुक्त विद्यमाने व कै. वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे स्मृतिप्रित्यर्थ हृदय रोगतज्ञ डाॅ.सौरभ गांधी यांचे मोफत हृदय रोग तपासणी शिबीर घेण्यात आले. डाॅ.सौरभ गांधी यांचेबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.सरीता गांधी, डाॅ.फडे, डाॅ.पताळे व त्यांचे सोबत इतर स्टाफ यांनी सदर शिबीर पार पाडण्यास हातभार लावला. यावेळी गावातील 80 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी रक्त, बी.पी, कोलेस्टेरॉल, व ई सी जी तपासणी करून घेतली.
डाॅ.सौरभ गांधी यांचा सत्कार डाॅ.हर्षवर्धन हाके यांनी केला . यावेळेस पी ए सी तांबवे येथिल वैद्यकीय अधिकारी डाॅ पठाण यांनीही शिबीरात मोलाचा वाटा उचलला. त्यांचा सन्मान सिताराम ढोबळे यांनी केला.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक ॲड.प्रमोद कुलकर्णी यांनी सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या शुभेच्छा देत आपण या गावातील आहोत या मातीशी आपण कांहीतरी देणे लागतो या जाणिवेतूनच हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगत कै .वासुदेव कुलकर्णी यांनी समाजकार्या बरोबरच सहकारामध्ये कार्याच्या आधारावर त्यांचे नावाचा ठसा उमटविला होता त्यांनी विझोरी बरोबरच अनेक गावातील सोसायटीमध्ये उत्कृष्ट काम केल्याची आठवण करुन देत मागिल महिन्यांत तांबवे सोसायटीचे चेअरमन विकास भाऊ कोळेकर व शेख तय्यब सर यांचा हृदय विकाराच्या झटक्यात निधन झाले त्यामुळे हृदयाची काळजी अत्यंत महत्वाची असुन यापुढे असे होवू नये म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे ॲड. कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी डाॅ.सौरभ गांधी यांनी हृदयाबाबतची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी दादा महाराज, बाळासो भोसले व ढोबळे,सुर्याजी भोसले,बाळासाहेब जाधव, रिजवाना सिस्टर,कुंभार सिस्टर,सिताराम चंदनशिवे,संजय साठे,रामभाऊ ढोबळे आदी उपस्थित होते.आभार डाॅ पठाण यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.