ताज्या घडामोडी
शिवामृत दूध उत्पादक संघाच्या फ्लेवर मिल्क प्लॅन्टचे विजयदादांच्या शुभहस्ते उद्घाटन

शिवामृत दूध उत्पादक संघाच्या फ्लेवर मिल्क प्लॅन्टचे विजयदादांच्या शुभहस्ते उद्घाटन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15 जानेवारी 2025 :
शिवामृत दूध उत्पादक संघाच्या फ्लेवर मिल्क प्लॅन्टचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रंसगी बँक ऑफ बडोदा बँकेचे रीजनल मॅनेजर संजीव कुमार हे प्रमुख उपस्थितीत होते.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राजसिंह मोहिते-पाटील, दूध संघाचे चेअरमन खा.धैर्यशील मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे, सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक रविराज इनामदार व इतर मान्यवर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.