ॲड. संतोष आबासाहेब पाटील यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती

ॲड. संतोष आबासाहेब पाटील यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
सोलापूर प्रतिनिधी दिनांक 13/03/2024 :
येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत असलेले तसेच ते सोलापूर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. संतोष आबासाहेब पाटील यांची भारत सरकार नोटरी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांचे शालेय शिक्षण हे दक्षिण सोलापूर येथील वडापूर या गावी झाले असून LLB व Diploma in Cyber Law ही विधी पदवी दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर , तर LLM ही पदवी भारती विद्यापीठ सोलापूर येथून मिळवली आहे.
सुरुवातीच्या काळात त्यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी वकील म्हणून दिवाणी व फौजदारी क्षेत्रातही काम केले आहे. त्यामुळे त्यांना विधी क्षेत्रातील न्यायालयीन कामकाजाचा , त्यातील प्रदीर्घ अनुभवाचा व परिश्रमाचा त्यांना फायदा झाला आहे. ते विधि क्षेत्रात गेली सोळा वर्षापासून कार्यरत आहे .
ॲड संतोष पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की नोटरी पदाचा उपयोग सामाजिक बांधिलकी जपत असताना तळा गळातील उपेक्षित वर्गाला या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे ते प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.त्यांची नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचेवर सोलापूर वकील संघटना, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.