संभाजी महादेव गोरवे यांचे अकस्मात निधन

संभाजी महादेव गोरवे यांचे अकस्मात निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13 जानेवारी 2025 : यशवंतनगर – शंकरनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रहिवासी संभाजी महादेव गोरवे (वय 66 वर्षे) यांचे काल पहाटे झोपेत असताना खराडी गाव, पुणे येथे अकस्मात निधन झाले. काही दिवसा पूर्वीपासूनच ते खराडी गाव पुणे येथे वास्तव्यास होते.
त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, सुना , 4 मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसऱ्याचा विधी मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 7:30 वाजता खराडी गाव स्मशान भूमी पुणे येथे होईल.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतः शिक्षण घेऊन प्रामाणिकपणे काम करणारे, अतिशय शांत, निगर्वी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले आमचे वर्गमित्र संभाजी महादेव गोरवे यांच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.