सकारात्मक विचार हाच खरा यशाचा पाया : मा. श्री. प्रमोद दोशी

सकारात्मक विचार हाच खरा यशाचा पाया : मा. श्री. प्रमोद दोशी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12 जानेवारी 2025 :
रत्नत्रय प्री स्कुल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगाव मध्ये शनिवार दिनांक ११ रोजी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ, तसेच रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीने दहिगाव परिसरातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता व कल चाचणीचा निकाल आणि विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व त्यानंतर ॲकॅडमी विद्यार्थिनींनी गणेश वंदना हे नृत्य सादर केले. सदर प्रसंगी बोलताना रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी म्हणाले “स्पर्धा हा शब्द सध्याच्या या काळात मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे पण ही जीवनातील जीवनाशी चाललेली स्पर्धा आनंददायी असणं तितकंच महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेचा उपयोग नेहमी सकारात्मकच असतो आणि तो त्याच दृष्टीने घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जीवन समृद्ध आणि यशस्वी होते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये जे विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.”
त्यानंतर रत्नत्रय प्री स्कुल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावचे चेअरमन रोनक चंकेश्वरा म्हणाले ” विद्यार्थ्यांना जर स्पर्धा परीक्षेला शालेय जीवनापासून बसवले तर त्यांना यश अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते व चाकोरी बाहेरचा विचार करण्यास सुरुवात करतो त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना बसवले पाहिजे. त्यांनी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यास शुभेच्छा दिल्या” रत्नत्रय प्री स्कुल व स्पर्धा परिक्षा ॲकॅडमी दहिगावचे मुख्याध्यापक सतीश हांगे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात सांगितले की, मुलांच्या शालेय जीवनापासून विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षाना बसवणे महत्त्वाचे आहे या परीक्षेंना प्रत्येक विद्यार्थी सहभागी होणे आवश्यक आहे. पालकांनी किंवा शिक्षकांनी यश अपयश न पाहता, विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीचे ज्ञान मिळते, याचा विचार केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना वेळेची नियोजन, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, अवांतर वाचन क्षमता आणि परीक्षेबद्दलची भीती कमी होते या फायद्यांचा विचार केला पाहिजे.त्यानंतर रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अमित गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी अमृतलाल गांधी,रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद दोशी, रत्नत्रय प्री स्कुल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावचे चेअरमन रोनक चंकेश्वरा, अमित गांधी, आयटीआयचे प्राचार्य गजेश जगताप. रत्नत्रय प्री स्कुल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावचे मुख्याध्यापक सतिश हांगे, शिवराम नाळे, निलेश शेंडे, गणेश खंडागळे , पूजा चव्हाण, शुभांगी सावंत, आगतराव किर्दक, सुभाष शिरतोडे आयटीआयचे सर्व विद्यार्थी, अकॅडमीचे सर्व विद्यार्थी तसेच परिसरातील असंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हांगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शुभांगी सावंत यांनी केले.