राजमाता जिजाऊ जयंती व छत्रपती थोरले शाहू महाराज राज्यभिषेक सोहळा 2025

राजमाता जिजाऊ जयंती व छत्रपती थोरले शाहू महाराज राज्यभिषेक सोहळा 2025
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11 जानेवारी 2025 : श्री काळभैरवनाथ मंदिर यवत (ता. दौंड, जिल्हा पुणे) येथे भीमथडी चे भागातील राजेभोसले परिवाराचे व भीमथडी चे भागातील ऐतिहासिक सरदार घराणे चे वशंज यांचे उपस्थितीत रविवारी दिनांक 12/1/2025 रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत राजमाता जिजाऊ जयंती व छत्रपती थोरले शाहू महाराज राज्यभिषेक सोहळा 2025 आयोजित केला आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे अशी नम्र विनंती आयोजक दोरगे शिलेदार परिवार व समस्त ग्रामस्त यवत यांच्यावतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी नॅशनल युनियन बॅकवर्ड एसएससी अँड मॅनॉरिटी महासंघ दिल्ली तसेच शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (सेवा जेष्ठ पत्रकार) अकलूज यांना निमंत्रित केले आहे.