मेंढ्या चोर व वन्यप्राण्यांच्या संकटामुळे मेंढ्यांचा व्यवसाय धोक्यात – संजय वाघमोडे

मेंढ्या चोर व वन्यप्राण्यांच्या संकटामुळे मेंढ्यांचा व्यवसाय धोक्यात – संजय वाघमोडे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
चरण (तालुका शाहूवाडी) दिनांक 9 जानेवारी 2025 :
कधीतरी एखाद्या मेंढीची चोरी व्हायची किंवा लांडगा एखादी मेंढी ठार मारायचा याबाबत मेंढपाळ ही काही तक्रार करायची नाहीत..परंतु गेल्या तीन चार वर्षात २५ , ३०, मेंढ्यांची चोरी होत आहे. तर जंगली प्राण्यांची संख्या वाढल्याने हे कळपाने हल्ला करतात एकाच वेळी १०-१५ बकरी ठार मारतात. अशा घटना रोज कुठे ना कुठेतरी घडत आहेत. मेंढ्या चोरीची तक्रार करायला गेल्यानंतर मेंढपाळालाच पोलीस दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये बसवून घेत असल्याने आणि त्याच्यावरच प्रश्नांचे सरबती करतात. तसेच आजपर्यंत एकाही चोरीचा तपास होऊन गुन्हेगारांना पकडून त्यांच्या वर कार्यवाही होत नसल्याने चोरी झाली तरी ही मेंढपाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास टाळत आहेत. अशा घटनामुळे मेंढपाळ मेंढरे विकुन मजुरी करणे पसंत करू लागल्याने संपूर्ण मेंढपाळ व्यवसायात धोक्यात आला आहे. असे प्रतिपादन संजय वाघमोडे यांनी केले. ते चरण ता. शाहुवाडी येथे नाम फलकाचे अनावरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेंढपाळ मेळाव्यात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शामराव कोळेकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय बांबवडे ता शाहूवाडी, आशिष पाटील वनरक्षक चरण तसेच सुनील शिरसाठ, बाबुराव कोळेकर, सुनील वगरे, पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष अतुल धनगर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ सिसाळ यांनी केले.
संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की अतिशय फायदेशीर असणारा मेंढी पालन व्यवसाय चोरी, वन्यप्राण्यांचे हल्ले व तणनाशकांचा बेसुमार वापर यामुळे धोक्यात आला आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर संपूर्ण शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय संपून जाईल आणि हा व्यवसाय संपला तर मटनाचा मागणी तशा पुरवठा होणार नाही. भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होईल. सहाय्यक आयुक्त डॉक्टर कोळेकर यांनी वेळच्यावेळी लसीकरण करून घेणे गरजेचे असून शेळ्या मेंढ्यांना किंवा जनावरांना एखाद्या आजाराची लागण झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा तो आजार होऊच नये म्हणून आपल्या पशुधनाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच शासनाच्या अनुदानावर शेळीपालन व मेंढी पालन यासाठी अनेक योजना आहेत या योजनांचा आपण सर्वांनी फायदा घेऊन आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करावा व व्यवसाय वाढवत असताना आपल्या पशुधनाची काळजीही घेणे महत्त्वाचे आहे एखाद्या आजाराची लागण झाल्यानंतर कोणाचे तरी ऐकून सरळ मेडिकल मधून औषध आणण्यापेक्षा जनावराच्या डॉक्टरांना दाखवून दाखवूनच औषध उपचार केलेला नेहमीच फायदेशीर ठरतो.
आपल्या शेळ्या मेंढ्या नेहमीच रानात मुक्कामास असताना रात्रीच्या वेळी तिथे प्रकाशाची सोय करण्यात यावी. शक्य असेल तर मोबाईल वरती किंवा रात्रभर गाणी वाजवत ठेवल्यास बिबट्यासदृष्य वन्यप्राणी अशा ठिकाणी येण्याचे टाळतो तसेच बिबट सारखा प्राणी जर आपल्या जवळ आल्यास आपण काहीही हालचाल न करता शांत रहावे त्या जंगली प्राण्यास त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे. घाबरून पळू नये. आपले दोन्ही हात वरती करून हलवत जोर जोराने ओरडल्यास जंगली प्राणी जवळ येत नाही. ऊस व शेतात जंगली प्राण्यांची पिल्ले दिसल्यास त्यांना कोणताही खाऊ घालू नये किंवा हात लावू नये जंगली प्राण्यांनी आपल्या जनावरावर हल्ला केल्यास त्याची तात्काळ माहिती जवळच्या वन कर्मचाऱ्यांना द्यावी. वन कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत हल्ला करण्यात आलेल्या शेळ्या मेंढी किंवा जनावर जागेवरून हलवू नये. वन्य प्राण्यांपासून आपल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आपणास शक्य असल्यास आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा पाळीव जनावरांच्या गळ्यात कापडी पट्टा बांधावा. सध्या ऊस तोड असल्याने जंगली प्राणी केव्हाही बाहेर पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी मेंढपाळ यांनी सावधगिरी बाळगावी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगल व जंगलातील वन्य प्राण्यांचा ठेवा गरजेचा आहे त्याचे आपण सर्वजण मिळून जतन करूया. असे वनरक्षक आशिष पाटील यांनी उपस्थित त्यांना आव्हान केले. सुभाष वगरे म्हणाले कि आजपर्यंत अनेक संघटना जवळून पाहिल्या परंतु संघटनांचे अस्तित्व निवडणुकीपुरतेच मर्यादित राहिले. परंतु संजय वाघमोडे आणि यशवंत क्रांती संघटना यांनी आपल्या कामामुळे जनमानसात वेगळा ठसा निर्माण केला. व समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावले. अडचणीच्या वेळी फोन केल्यास तातडीने यशवंत क्रांती संघटनेकडून मदत मिळत असल्याने अल्पावधीतच यशवंत क्रांती संघटना नावारुपाला आली. आणि सर्व समाज बांधव एकत्र येऊन यशवंत क्रांती संघटनेच्या गावोगावी शाखा काढून आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याने संघटनेच्या माध्यमातून समाज मोठ्या प्रमाणात एकसंघ होत आहे.
शाखाप्रमुख रायसिंग सर्जेराव शिसाळ , अध्यक्ष राजेंद्र मारुती शिसाळ , उपाध्यक्ष पार्थ काशिनाथ शिसाळ , सेक्रेटरी रणवीर रंगराव शिसाळ , खजिनदार श्री सुनील शंकर सिद्ध , सदस्य नागेश शिसाळ, ओंकार शिसाळ, संदीप ( रवी ) शिसाळ, रंगराव शिसाळ, मारुती शिसाळ, आनंदा बंडगर, (बांबवडे ) उत्तम जानकर, संदीप जानकर, दिनकर जानकर (डोनोली ), लक्ष्मण कारंडे (पाटणे ), बाबासो वग्रे भाऊसो वग्रे, यांची निवड करण्यात आली.
यावेळी ग्रा. प. सदस्य भगवान, शिसाळ , उत्तम तांदळे, नारायण शिसाळ, शंकर शिसाळ , आनंदा शिसाळ, जगन्नाथ शिसाळ , महेंद्र शिसाळ, तानाजी शिसाळ, शंकरसिद (चिकुर्डेकर) सर्जेराव मरगाळे, आक्काताई रायसिंग शिसाळ, लक्ष्मी मारुती शिसाळ ,प्रतीक्षा संदिप शिसाळ, संगीता काशिनाथ शिसाळ ,सुजाता सुनील शिदध ,बणू सर्जेराव मरगळे, मंदा सर्जेराव शिसाळ ,सानिका राजेंद्र शिसाळ वसंत वग्रे ,कोंडीबा वग्रे, सुभाष वग्रे, नामदेव वग्रे, सरूड प्रकाश साळसकर , बाबुराव मुडळे, महादेव बंडगर, नथुराम बंडगर, आनंदा बंडगर (शाहीर) , आबासाहेब बंडगर, शिवारे, शाखेचे अशोक ज्ञानदेव मुडळे.संघटक, विजय धोंडीराम मुडळे. उपाध्यक्ष , दत्तात्रय रंगराव मुडळे.शाखा संपर्कप्रमुख, प्रताप वाघमोडे, ऐतवडे शाखा, सरुड, मालाईवाडा, शिवारे, करजवडे, बांबवडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.