आठ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार ए.सी.बी.च्या जाळ्यात.
आठ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार ए.सी.बी.च्या जाळ्यात.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
माळशिरस /प्रतिनिधी दिनांक 8 जानेवारी 2025 :
भावकीतील भांडणातील गुन्ह्य़ात सहकार्य करण्यासाठी व तक्रारदार याच्या पत्नीस अटक न करण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात यास ए.सी.बी.ने रंगेहात पकडले .
याबाबत मिळालेली माहिती अशी कि दोन भावामध्ये भांडणे झाली होती. यामध्ये दोघांनी एकमेका विरोधात माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली होती.तक्रारदार व त्याचे भाऊ यांना सदर गुन्ह्यात अटके नंतर न्यायालयातून जमीन मिळाला होता.तक्रारदार यांच्या पत्नीस अटक न करण्यासाठी व दोषारोप पत्रात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी नंतर ८ हजार तडजोड झाली.याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधला.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व डॉ शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार ,गणेश पिंगुवाले ,पोलीस अंमलदार सायबन्ना कोळी ,संतोष नरोटे ,गजानन किणगी,चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून थोरात यांना ८ हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.