ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने प्रशांत माळवदे यांचा सन्मान

ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने प्रशांत माळवदे यांचा सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 7 जानेवारी 2025 :
ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाच्या निमित्ताने तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांना ऑनलाइन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपनकर यांनी लेखी संदेश पाठवला असून त्यामध्ये पत्रकारांच्या विषयी त्यांनी सांगितले आहे की पत्रकार गेली अनेक वर्ष समाज प्रबोधनाचे कार्य निरपेक्षपणे करीत आहेत. सध्याच्या युगात संपादकांना वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्यासाठी व जाहिरातीसाठी झगडावे लागत आहे. विविध माध्यमांच्या सहाय्याने समाज जागृती करण्याचे कार्य आपण करीत आहात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या या सेवाभावी सत्कर्याची दखल घेऊन आपणास पत्रकारितेतील हे मानाचे सन्मानपत्र देताना आम्हाला आनंद होत आहे. आपले कार्य नवोदय पत्रकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्यासारख्या निषपृह आणि निर्भीड पत्रकारामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही भक्कमपणे उभा आहे. असेही तिरपणकर यांनी सांगितले आहे. यावेळी सचिव संचिता भंडारी यांनी आभार व्यक्त केले.
भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव तसेच नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, संपर्कप्रमुख व प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आभार व्यक्त करीत प्रशांत माळवदे यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.