“देशातली अन्न सुरक्षा शाबीत ठेवायची असेल तर शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकारने नियोजन करावे” – विठ्ठल राजे पवार.

“देशातली अन्न सुरक्षा शाबीत ठेवायची असेल तर
शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकारने नियोजन करावे” – विठ्ठल राजे पवार.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/01/2024 : “देशातली अन्न सुरक्षा शाबीत ठेवायची असेल तर शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकारने नियोजन करावे” असा सल्ला शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी सरकारला दिला आहे.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान महासंघ, महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ, ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, महा ॲग्रो कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी सकाळी नऊ वाजता संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांच्या उपस्थितीत, सीईओ आर एस नाईक व प्रसिद्धी व संपर्कप्रमुख डॉक्टर बळीराम ओवळ, यांचे हस्ते 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे ज्येष्ठ नेते व शिरूर हवेलीचे अध्यक्ष यशवंत बांगर होते. कामगार आघाडीचे अध्यक्ष हिरामण बांदल, जेष्ठ सभासद विजयकुमार काकडे, युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर महेश गिरी , पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील, खेड राजगुरुनगर चे अध्यक्ष विठ्ठल पाटील लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिपक फाळके व शेतकरी उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना विठ्ठल अराजे पवार म्हणाले की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा राम हा भारताचे काळ्याआई शेतामध्ये उभा आहे. शेतकरी हा राम असून तो सक्षम उभा राहिला पाहिजे. भारत आणि राज्याची अन्नसुरक्षा शाबीत ठेवायची असेल तर शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकारने धोरणात्मक निर्णय तात्काळ जाहीर करावेत. शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल इतका बेस रेट (साखरेच्या बेस रेट प्रमाणे.) जाहीर करून धोरणात्मक निर्णय तात्काळ घेणे आवश्यक आहे. अशी मागणी करत जिल्हाधिकारी पुणे यांना मागण्यांचे निवेदन दिल्याचे सांगितले. भारत स्वातंत्र्य होऊन आज ७५ वर्ष झालेली आहेत मात्र देशातला सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, अल्पसंख्यांक, कुणबी शेतकरी, पिछडा वर्ग सुखी झालेला नाही! यामध्ये भारत आणि इंडियाची दरी जी निर्माण झालेली आहे ती दरी सरकारने लवकरात लवकर दूर करून, भरून काढत खऱ्या अर्थाने भारतामध्ये आणि भारतीयांना ७५ वर्षांनंतर स्वातंत्र्य मिळाल्याचे भारताच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त दाखवून द्यावे असेही यावेळी म्हटले आहे.